You are currently viewing “आनंद शिधा” मिळाल्याने रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड होणार– चेअरमन धनश्री गवस

“आनंद शिधा” मिळाल्याने रेशनकार्ड धारकांची दिवाळी गोड होणार– चेअरमन धनश्री गवस

वाफोली विकास सेवा सोसायटीत पोहचला “आनंद शिधा”

सावंतवाडी

वाफोली विकास सेवा सोसायटी येथे आज ‘आनंद शिधा’चे वाटप करण्यात आले. यावेळी चेअरमन सौ.धनश्री गवस, व्हाईस चेअरमन अनिल गवस, माजी सरपंच शिवाजी गवस, देवस्थान समिती अध्यक्ष विलास गवस, विलवडे सरपंच दिनेश दळवी, माजी उपसभापती कृष्णा सावंत, सावंतवाडी तालुका दक्षता कमिटी सदस्य सोनू दळवी, शैलेश गवस, माजी ग्रामपंचायत सदस्य उमेश शिरोडकर, वितरक संगीता कोकरे, सचिव सुधा परब, मापारी हरी गवस, अनिल गवस, विलवडे माजी सरपंच प्रकाश दळवी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. दरम्यान, चेअरमन धनश्री गवस यांनी सांगितले की, ‘आनंद शिधा’चे वाटप सर्व लाभधारकाना करण्यात येणार आहे. दिवाळी सणात या शिधा वाटपामुळे मदत होणार असल्याने सर्वांची दिवाळी गोड होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा