शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवजयंती साजरी

शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवजयंती साजरी

कणकवली

शिवसेनेच्या प्रथेप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज जयंती तिथीनुसार शिवसेना कणकवली तालुक्याच्या वतीने शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात साजरी करण्यात आली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराज हे प्रजेवर मुलाप्रमाणे प्रेम करणारे राजे होते. स्वराज्याची शपथ घेऊन स्वतंत्र स्वराज्य निर्माण करणारे ते एकमेव राजे होते. समाजात वावरताना महाराजांचा आदर्श आपण सर्वांनी नेहमीच घेतला पाहिजे. शिवजयंतीला शिवरायांचा जयजयकार करताना प्रत्येक दिवशी आपण शिवरायांच्या विचारांनी प्रेरित काम करायला हवे. शिवरायांचे भक्त आपण तेव्हाच शोभू जेव्हा आपण एकत्र येऊन जनतेच्या हिताचे काम करू. आपल्या सर्वांना स्फूर्ती देणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराजांना माझे कोटी कोटी प्रणाम,” असे गौरवोद्गार संदेश पारकर यांनी यावेळी काढले.

यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख शैलेश भोगले, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, अँड.हर्षद गावडे, शेखर राणे, जि.प.सदस्या स्वरुपा विखाळे, राजु राठोड, ललित घाडीगांवकर, सुनिल पारकर, रुपेश आमडोसकर, अनुप वारंग, निसार शेख, विलास गुडेकर, आबा मुंज, रश्मी बाणे, संजना कोलते, समिर परब, प्रकाश मेस्त्री, प्रतिक रासम, संजय पारकर, शरद सरंगले, पराग म्हापसेकर, बाबु केणी, विश्राम सावंत आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा