सरकारने तात्काळ गरिबांना पैसे देण्यात यावे – आयएमएफने दिला मोदी सरकारला  सल्ला…!!!!

सरकारने तात्काळ गरिबांना पैसे देण्यात यावे – आयएमएफने दिला मोदी सरकारला सल्ला…!!!!

सरकारने तात्काळ गरिबांना पैसे नेण्यात यावे – आयएमएफने दिला मोदी सरकारला  सल्ला…!!!!

 

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने दिलेले पहिले पॅकेज हे तुटपूंजे असून, तात्काळ भारतातील गरिबांना रोख पैसे देण्याचा सल्ला शुक्रवारी दि.१६ ऑक्टोबर रोजी जागतिक नाणेनिधी अर्थात इंटरनॅशनल मॉनेटरी फंड(आयएमएफ)ची चीफ इकोनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांनी दिला आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था अक्षरश: कोलमडली आहे. अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी सरकारकडून विविध उपाययोजना राबवल्या जात आहेत. मात्रा सरकारकडून २० लाख कोटी रुपयांचे पहिले पॅकेज आणि आता केंद्रीय कर्मचाऱ्यांना खर्च करण्यासाठी ४५ हजार कोटी रुपयांचे अप्रत्यक्ष पॅकेज देण्यात येत आहे. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेत काही सुधारणार नाही. यासाठी सरकारला शहरी गरीब आणि स्थलांतरित मजुरांना पैसे द्यावे लागतील. तसेच सरकारला आणखी महत्वाची पावले उचलावी लागतील, असे मत गोपीनाथ यांनी व्यक्त केले आहे.

*सरकारचे पॅकेज केवळ २ टक्के खर्च करण्याजोगे*

आयएमएफ चीफ इकॉनॉमिस्ट गीता गोपीनाथ यांनी म्हटले की, भारताने जीडीपीच्या सुमारे ७ टक्के इतके पॅकेज जाहीर केले आहे. परंतु सरकारने केलेली मदत ही कर्ज आणि पत हमी योजनेंतर्गत आहे. सरकारने दिलेल्या पॅकेजपैकी केवळ २ टक्के खर्च थेट खर्च करण्यासारखा होता.

*गरिबांना अधिक मदतीची गरज*

केंद्र सरकारने लोकांना ५०० रुपयांची थेट रोख रक्कम हस्तांतरित केली. ग्रामीण भागात मोफत धान्य वाटप केले गेले आहे. मात्र यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळणे अवघड आहे. कदाचित म्हणूनच गोपीनाथ यांनी शहरी भागातील गरीब आणि स्थलांतरित मजुरांना अधिकाधिक मदत देण्याचे आवाहन केले आहे.

 

*कल्याणकारी योजना संपुष्ठात येतायेत*

कोरोना व्हायरस महामारीदरम्यान चालवल्या जाणाºया कल्याणकारी योजना आता संपुष्टात येत आहेत. त्यामुळे त्यांचा कालावधी वाढवणे आवश्यक आहे. जेणेकरून अधिकाधिक शहरी गरीब आणि स्थलांतरित कामगार त्यांच्या कार्यक्षेत्रात येतील.

*२०२२ पर्यंत अर्थव्यवस्था रुळावर नाहीच*

जागतिक अर्थव्यवस्था २०२२ पर्यंत पुन्हा रुळावर येणार नाही, असे गीता गोपीनाथ यांनी म्हटले आहे. काही देशांमध्ये, २०२३ पर्यंतही परिस्थिती सामान्य होणार नाही. आत्मनिर्भर भारताच्या प्रश्नावर त्या म्हणाल्या की, पुरवठा साखळीसाठी आयात आणि निर्यात या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. जागतिक पुरवठा साखळीशिवाय आयात-निर्यातीत फारसे यश मिळणार नाही.

प्रतिक्रिया व्यक्त करा