You are currently viewing काळानुरूप पारंपारिक दिवाळी बदलते आहे का?
  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

काळानुरूप पारंपारिक दिवाळी बदलते आहे का?

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ उल्का कुलकर्णी लिखीत अप्रतिम लेख*

*काळानुरूप पारंपारिक दिवाळी बदलते आहे का?*

काळानुरूप पारंपारिक दिवाळीत नक्कीच बदल होत आहे. पूर्वीची दिवाळी आणि आताची दिवाळी यात जमीन-अस्मानाचे अंतर आहे. सततचे वाढणारे स्पर्धेचे युग, त्यामुळे वाढणाऱ्या गरजा, परिणामी मनुष्याची पैसा मिळवण्याची धडपड, त्यासाठीची धावपळ यामुळे अमर्यादित कष्ट करण्याची सवय लागली. त्यामुळे प्रत्येक गोष्टीत बदल झाला. यामध्ये प्रामुख्याने खालील गोष्टी अंतर्भूत होतील.

एकत्र कुटुंब पद्धती_ पूर्वी एकत्र कुटुंबपद्धती असायची. त्यामुळे प्रत्येक सण हा एकमेकांच्या सहकार्याने, खेळीमेळीने साजरा होत असे. सहाजिकच एकमेकांच्या भावनांची जपणूक होत होती. पाच ते सहा दिवस चालणाऱ्या दिवाळीचा, अगदी पुरेपूर आनंद घेतला जायचा. घरामध्ये ज्येष्ठ व्यक्तींचा वावर असायचा. त्यामुळे सणाला एक वेगळेच महत्त्व प्राप्त असायचे.

आत्ताच्या काळात कुटुंबे विभक्त झाली आहेत.
त्यामुळे भावनेतील ओलावा, टिकवण्याची धडपड दिसत नाही. त्यामुळे एक प्रकारचा यांत्रिकपणा जगण्यात आलेला आहे. त्यामुळे सणाचा आनंद मर्यादित झाला.

धार्मिकता__ दिवाळीच्या पाच दिवसांचे वेगवेगळे अध्यात्मिक महत्त्व आहे. पूर्वीच्या दिवसात ते श्रद्धेने जपले जायचे. लक्ष्मीपूजन, पाडवा या दिवशी आमच्याकडे अजूनही पुरणाचा नैवेद्य असतो.
आताच्या काळात दिवाळी म्हणजे मौजमजा. नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन, यातला फरक ही बऱ्याच जणांना माहीत नसतो.

अगत्य__ पूर्वीच्या काळी दिवाळीच्या निमित्ताने एकमेकांना बोलावले जायचे. तेवढेच एकमेकांच्या घरी जाणे हसीमजाक, होत असे. एकमेकांच्या घरी फराळाचे डबे दिले जायचे.
पण आता कोणाला इच्छा ही नसते आणि वेळही नसतो. वेळ असला की बाहेर फिरायला जाण्याची पद्धत पडली आहे.

पेहराव__ पूर्वीची स्त्री, नऊवारी किंवा काठापदराची साडी, विविध अलंकारांनी युक्त असायची. फक्त सोन्याचे अलंकार वापरले जायचे.गृहलक्ष्मीचा थाट उठून दिसायचा.
पण आता वेगवेगळ्या प्रकारचे फॅशनचे कपडे, साड्या, वेगवेगळ्या प्रकारची इमिटेशन ज्वेलरी घातली जाते. आणि ब्युटी पार्लर यात महत्त्वाचे भूमिका बजावते.

सजावट __ पूर्वीच्या काळी घर फक्त आकाश कंदिलांनी, आणि पणत्यांनी सजलं जायचं.
आता लायटिंग शिवाय दिवाळी संभवतच नाही. वेगवेगळ्या प्रकारचे आकाश कंदील, लाईट वरच्या समया, याची नुसती रेलचेल असते. वेगवेगळ्या प्रकारचे दिवे मार्केटमध्ये मिळतात. त्याने घर सुशोभित केले जाते.

खरेदी__ पूर्वीच्या काळी गरजा मर्यादित होत्या त्यामुळे खरेदी ही मर्यादित असायची. आत्ता दिवाळी म्हटले की अगदी पायपुसण्या पासून ते पडद्यापर्यंत सगळी नवीन खरेदी केली जाते.

रांगोळी __ पूर्वी फक्त ठिपक्यांच्या साह्याने, साधी रांगोळी काढली जायची. ठराविक साचा असायचा.
पण आता भरपूर पर्याय उपलब्ध झाले आहेत. रांगोळी काढण्याच्या पद्धती ही बदलल्या आहेत. रांगोळीतून ठिपके हद्दपारच झाले आहेत. अगदी न येणाऱ्यांना सुध्दा छापाने रांगोळी काढता येते.

हल्ली, एकत्र कुटुंबाबरोबर वेळ घालवण्यापेक्षा, सुट्टी मिळाली की, बाहेर फिरायला जाणे पसंत करतात. प्रगतीच्या संधी पुढे, सणांचे महत्त्व कमी होत चालले आहे. फटाके फक्त दिवाळीला आणले जायचे. पण हल्ली छोट्या-मोठ्या कार्यक्रमांनाही फटाक्यांची आतषबाजी असते. पूर्वी ठराविक फटाके मिळायचे. पण आता वेगवेगळ्या प्रकारचे मिळतात.
पूर्वीची दिवाळी म्हणजे वर्षातला मोठा सण असायचा. पण आता “राजाला दिवाळी माहीतच नाही”
अशी अवस्था असते. कारण रोजच दिवाळी सारखा थाट असतो.

सौ उल्का कुलकर्णी ✍️ नाशिक

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा