You are currently viewing डोकेदुखीच्या आजाराला कंटाळून मुटाट येथील विवाहितेची आत्महत्या

डोकेदुखीच्या आजाराला कंटाळून मुटाट येथील विवाहितेची आत्महत्या

देवगड :

प्रतिनिधी सततच्या डोकेदुखीच्या आजाराला कंटाळून मुटाट गयाळवाडी येथील सौ.प्रणाली प्रकाश कोळसुमकर (४०) विवाहित महिलेने कलमबागेत फवारणीसाठी वापरण्यात येणारे कीटकनाशक प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना २२ ऑक्टोबर रोजी रात्री ११.१० वा.सुमारास घडली.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनूसार, सौ.प्रणाली ही गेली चार वर्षे डोकेदुखीच्या आजाराने त्रस्त होती.तिच्यावर पडवे येथील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते मात्र प्रकृतीत सुधारणा होत नसल्याने गेली चार वषे सुरू असलेल्या आजारपणाला कंटाळून २२ ऑक्टोबर रोजी रात्री तिने राहत्या घरी कलमबागेत फवारणीसाठी वापरण्यात येणारे औषध प्राशन केले.तिला तात्काळ देवगड येथे डॉ.बोरळफकर यांच्या रूग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र उपचारापुर्वीच तिचा मृत्यु झाला.देवगड ग्रामीण रूग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला.याबाबत देवगड पोलिस स्थानकात महिलेचा पती प्रकाश सखाराम कोळसूमकर यांनी खबर दिली असून पोलिसांनी आकस्मिक मृत्यु म्हणून नोंद केली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा