*मानव साधन विकास संस्था अंतर्गत परीवर्तन केंद्र व जनशिक्षण संस्थान यांच्या माध्यमातून ५० प्रशिक्षित महिलांना देण्यात आल्या शिलाई मशीन*
वैभववाडी :
माजी केंद्रीय मंत्री ना. सुरेश प्रभु याच्या प्रयत्नातुन, मानव साधन विकास संस्था अंतर्गत असलेल्या परीवर्तन केंद्राच्या माध्यमातुन जनशिक्षण संस्थान सिंधुदुर्ग मार्फत वैभववाडी तालुक्यातील शासन मान्यताप्राप्त शिवणकला संस्थेत प्रशिक्षित असलेल्या ५० महीलांना आज मोफत शिलाई मशिनचे वाटप करण्यात आहे. एडगाव येथील रामेश्वर विद्यामंदिर येथे हा कार्यक्रम संपन्न झाला.
मा. सुरेश प्रभु यांच्या प्रयत्नातुन जनशिक्षण सिंधुदुर्ग मार्फत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील १००० महीलांना मोफत शिलाई मशिन वाटप करण्यात आल्या आहेत. सदर शिलाई मशिन खरेदी करणेसाठी गोवा विमानतळ प्राधिकरणाने आर्थिक व्यवस्था केलेली आहे.
या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी परीवर्तन केंद्र सिंधुदुर्गचे जिल्हा समन्वयक विलास हडकर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले.
या कार्यक्रम प्रसंगी भाजपा उपाध्यक्ष प्रमोद रावराणे, भाजपा युवा मोर्चा पदाधिकारी किशोर दळवी, माजी जि.प. सदस्य सुधीर नकाशे, संजय रावराणे, आदी पदाधिकारी, मान्यवर तसेच महीला लाभार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी मानव साधन विकास संस्थेच्या अध्यक्षा सौ. उमा सुरेश प्रभु यांचे भाजप पदाधिकाऱ्यांनी आभार मानले.