You are currently viewing बांद‍ा येथे ‘सत्यम प्रभागसंघ बांदा’ यांची पहिली वाषिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..

बांद‍ा येथे ‘सत्यम प्रभागसंघ बांदा’ यांची पहिली वाषिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न..

बांदा :

 

बांद‍ा येथील आनंदी मंगल कार्यालयात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, तालूका अभियान कक्ष सावंतवाडी अंतर्गत ‘सत्यम प्रभागसंघ बांदा’ यांची पहिली वाषिक सर्वसाधारण सभा उत्साहात संपन्न झाली.

या वेळी माजी जिल्हा परिषद सदस्य‍ श्वेता कोरगांवकर यांनी “ग्रामीण भागातील महिलांनी मुळात असलेल्या कौशल्याची कार्यक्षमता वाढवून उत्पन्नात वाढ होऊन कुटुंब आर्थिक सक्षम व्हावे म्हणून सरकार विविध योजना राबवते. त्यापैकीच एक म्हणजे महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान आहे. ग्रामीण भागात महिला विशिष्ट उद्दीष्ट घेऊन एकत्र आले पाहीजे. आपल्या कुटुंबातील महिलांनी चुल व मुल मर्यातदित न राहता त्यांनी सरकारच्य‍ा या अभियानाला बळ देत आपली महिल‍ांनी एकत्र येऊन आपली उन्नती साधली पाहीजे” असे प्रतिपादन केले.

सभागृह‍ात बांदा, नेतर्डे, ताबुंळी, असनिये, पडवे माजगाव, डिंगणे, गाळेल, डोंगरपाल आदी ७ गावातील ८४५ महिला उपस्थित होत्या. यावेळी कोरगावकर बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी पंचायत समिती उपसभापती शीतल राऊळ, तालुका कृषी अधिकारी प्रमोद बनकर, मंडळ कृषी अधिकारी प्रकाश घाडगे, लुपिनचे जिल्हा समन्व्यक प्रताप चव्हाण, तांबुळी सरपंच अभिलाष देसाई, तंटामुक्ती अध्यक्ष गुरूनाथ सावंत, रूपाली शिरसाट, अर्चना पांगम, प्रज्ञा कामत, प्रिया कामत, समुपदेशक नमिता परब,अर्पिता वाटवे, तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष स्वाती रेकडर, तालुका व्यवस्थापक शिवानंद गवंडे, तालुका व्यवस्थापक रिदिमा पाटकर, कौशल्य समन्वयक रश्मी भाईप, प्रभाग समन्वयक अपर्णा भंडारी, गजानन राठोड, सत्यम प्रभागसंघ अध्यक्ष उत्कर्षा कदम, कोषाध्यक्ष वैशाली पै, सचिव सुवर्णा गाड प्रभागातील सर्व सीआरपी व इतर सर्व केडर उपस्थित होते.

बांदा प्रभागसंघ व्यवस्थापक शिल्पा सावंत व बांदा प्रभाग समन्वयक कुवरसिंग पाडवी यांच्या नियोजनखाली वार्षिक सर्वसाधारण सभा पार पडली. प्र‍ास्थाविक उत्कर्षा कदम, सुत्रसंचालन लक्ष्मी सावंत, मनोगत वैशाली पै, आभार सुवर्णा गाड यांनी मानले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

fourteen − 4 =