You are currently viewing “आनंद शिधा” ऑफलाईन पद्धतीने द्या; मालवण शहर भाजपची मागणी

“आनंद शिधा” ऑफलाईन पद्धतीने द्या; मालवण शहर भाजपची मागणी

तहसीलदारांचे वेधले लक्ष ; सर्व्हर डाऊनमुळे ऑनलाईन व्यत्यय

मालवण

राज्य शासनाच्या वतीने यंदा दिवाळी सणाच्या निमित्त शासकीय रास्त धान्य दुकानांवरून १०० रुपयात “आनंद शिधा” देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. मात्र सध्या ऑनलाईन मधील सर्व्हर डाऊन मुळे शिधा मिळण्यात व्यत्यय येणार असून हे शिधा साहित्य ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन देण्यात यावे, अशी मागणी भाजपच्या शिष्टमंडळाने मालवण तहसीलदारांकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.

या शिष्टमंडळात माजी नगराध्यक्ष सुदेश आचरेकर, खरेदी विक्री संघाचे माजी चेअरमन आबा हडकर, राजू बिड्ये, भाई मांजरेकर, सुनील बागवे, बाळू मालवणकर आदी उपस्थित होते. या निवेदनात म्हटले आहे की, महाराष्ट्र शासनाद्वारे राज्यातील जनतेला १०० रुपयांमध्ये ४ वस्तू देण्याचे धोरण ठरले आहे. त्यांच्या आनंद शिधा अद्याप पर्यंत मालवण तालुक्यात धान्य दुकानावर पोहोचलेला तसेच. तसेच सध्या ई-पॉस मशिनचा सर्व्हर डाऊन असल्याने तो आनंद शिधा सामान्य लोकांना दिवाळीत मिळणार नाही. तरी आपल्या स्तरावरुन तो शिधा ऑफलाईन वितरण करण्यास आदेश दिल्यास शासनाचा उद्देश सफल होईल. ऑनलाईन प्रोसेस प्रक्रिया पुढील महिन्यात करता येईल. त्यासाठी योग्य तो निर्णय घेऊन आनंद शिधा लवकरात लवकर जनतेपर्यंत पोहोचवावा, अशी मागणी करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा