इचलकरंजी : प्रतिनिधी
हटकर कोष्टी समाज संस्था, महाराष्ट्र राज्य संघटनेअंतर्गत कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणीची लोकशाही पद्धतीने निवड पार पडली. यावेळी जिल्हा अध्यक्षपदी इचलकरंजीचे इराण्णा सिंहासने यांची तर उपाध्यक्षपदी राजू कोन्नूर, सचिवपदी बिद्रीचे विश्वनाथ डफळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. अध्यक्षस्थानी राज्याध्यक्ष डॉ. नंदकुमार वसवाडे होते. तर राज्य सुकाणू समितीचे सदस्य व इचलकरंजी समाज अध्यक्ष शिवकांत मेत्री, उद्योगपती डी. एम. कस्तुरे, सुनिल सांगले यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हा कार्यकारिणी निवडीसाठी जिल्ह्यातील प्रत्येक गावातील संचालकांकडून नावे मागविण्यात आली होती. त्यातून या निवडी जाहीर करण्यात आल्या. यावेळी हात उंचावून उपस्थित समाज बांधव व पदाधिकाऱ्यांनी समर्थन केले.
यावेळी हटकर कोष्टी समाज युवक मंडळ, हटकर कोष्टी समाज महिला मंडळ, श्री बनशंकरी ट्रस्टच्या वतीने वर्षभर केलेल्या कार्याचा आढावा घेण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते युवकअध्यक्ष अमित खानाज, महिला अध्यक्षा स्वाती मेत्री यांच्यासह युवक, महिला व विश्वस्त यांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी हटकर कोष्टी समाज युवक मंडळ, महिला मंडळ व श्री बनशंकरी ट्रस्टने विशेष प्रयत्न केले. प्रास्ताविक प्रा. चिंतामणी पारिशवाड यांनी केले. स्वागत सचिन हळदे यांनी केले. तर आभार प्रशांत गलगले यांनी मानले.
यावेळी सुकाणू समिती सदस्य बाळासाहेब मनवाडी, गणेश कोल्हापूरे, वसंत महिंद, उपाध्यक्ष प्रभाकर उरणे, संजय म्हेतर, सुरेश पाडळे, अनिल तुळसनकर, सांगली जिल्हाध्यक्ष योगेश हाळाळे, शंकर बेले, किरण कोष्टी यांच्यासह समाज बंधू-भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
जिल्हा कार्यकारिणी अशी – अध्यक्ष- इराण्णा सिंहासने, उपाध्यक्ष राजू कोन्नूर (इचलकरंजी), सचिव – विश्वनाथ डफळे (बिद्री), संचालक – रजनीकांत लठ्ठे, मल्लिकार्जुन अष्टगी (इचलकरंजी), शिवकुमार मिरजे (पेठवडगाव), कैलास म्हेत्तर (संगमनगर), संजय व्हनबट्टे (वसगडे), संदेश म्हेत्तर (मुरगुड), प्रशांत मेत्री (कागल), गजानन भाकरे (कोगनोळी), संदीप हळदे (पट्टणकोडोली), सुनील विभुते (हुपरी), शिवाप्पा मेत्री (चंदुर), विजय विभुते (कोरोची).
सदस्य –
महादेव विभुते, बंडोपंत बिरंगे, विजय कडगावे, विजय मिरजे, उमेश कबाडे, सिद्धाराम कळसे, निलेश लोणी.
या निवडीबद्दल नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वस्तरातून अभिनंदन होत आहे.