You are currently viewing डॉ. सचिन कचोटे – कोल्हापूर यांनी रचले संगीत विश्वात एक आदर्शवादी सांगितिक कार्य

डॉ. सचिन कचोटे – कोल्हापूर यांनी रचले संगीत विश्वात एक आदर्शवादी सांगितिक कार्य

सर्वात कमी वयात वयाच्या ४० व्या वर्षी संगीताचार्य पदवी मिळविणारे आणि तबला वादनात संगीताचार्य आणि phd अशा दोन डॉक्टरेट पदवी मिळविणारे तबला वादक डॉ.श्री सचिन कचोटे सर (कोल्हापूर) यांनी रचले संगीत विश्वात एक आदर्शवादी सांगितिक कार्य.

गुरुवर्य डॉ.श्री सचिन कचोटे सर (कोल्हापूर) यांनी सर्व संगीत साधकांना आदर्शवादी कार्य संगीत क्षेत्रात करत अखिल भारतीय गांधर्व महाविद्याल मंडळ (मुंबई) वतीने संगीताचार्य (doctorate) बहाल केली असली तरी त्यांच्यातील एक सच्चा कलाकार स्वस्थ न राहता तबला वादन कलेची साधना अविरत करून दिनांक ९ एप्रिल २०२१ रोजी द सयाजीराव विश्वविद्यालय बडोदा-गुजरात यांच्यावतीने दुसरी तबला phd करत doctorate ही पदवी आताच बहाल केली आहे.  गुरुजींच्या बाबतीत सांगायचे झाल्यास खूप अवर्णनीय असा संगीत प्रवास गुरुजींनी कमी वयात केला आहे संगीत कलेत तबला वादनाची अविरत सेवा करताना गायन, हार्मोनियम या विषयात सुद्धा डॉ.सचिन कचोटे सरांनी आपला ठसा दमदार उमटवला आहे, याबाबत अधिक म्हणजे सरांनी २००३ साली तबला विशारद(अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय):जिल्हास्तरीय प्रथम क्रमांक उत्तीर्ण, २००९ साली तबला अलंकार (अखिल भारतीय स्तरावर द्वितीय),२०१५ साली संगीत विशारद गायन तसेच आकाशवाणी सांगली B हाय ग्रेड प्राप्त केली. २०१६ साली संगीत विशारद हार्मोनियम तसेच एम. ए.तबला (विद्यापीठात सर्वप्रथम),२०१७ साली PET तबला, २०१८ साली UGC नेट तबला तसेच संगीताचार्य (doctorate) अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालय, मुंबई आणि आताच ९एप्रिल २०२१ रोजी PHD तबला करत द सयाजीराव विश्वविद्यालय, बडोदा, गुजरात यांच्या वतीने डॉक्टरेट ही पदवी संपादन केली आहे,अखिल भारतीय बाल्मीकी-म्हेतर समाजातून शास्त्रीय संगीतामध्ये तबला विष्यातून संगीताचार्य व पी.एच.डी.अशा दोन डॉक्टरेट (doctorate) करणारे अखिल भारतीय स्तरावर सर्वात प्रथम तबलावादक म्हणून गौरव प्राप्त झाले आहेत, असा हा प्रत्येक संगीत शिकणाऱ्या व पुढे संगीत क्षेत्रात झेप घेणाऱ्या विद्यार्थ्याला हा प्रवास नक्कीच आदर्शवादी ठरेल असे कार्य डॉ.सचिन कचोटे यांनी केलेला आहे त्यांना सांगीतिक गुरू म्हणून स्व.पं.गोविंदराव माजगावकर, कोल्हापूर, तसेच पंडित श्री अमोद दंडगे, कोल्हापूर, स्व.अरविंद मुळगावकर, मुंबई यांचे संगीत मार्गदर्शन लाभले.  तसेच मार्गदर्शक गुरू म्हणून डॉ.आनंद नायगावकर, मुंबई(संगीताचार्य तबला), आणि डॉ.अजय अष्टपुत्रे, बडोदा (प्रोफेसर तबला) यांचे मार्गदर्शन लाभले तसेच आशीर्वाद म्हणून दीक्षा गुरू श्री सद्गुरू कैवल्यानंद स्वामी, उजैन, आपले आईवडील, धर्म गुरू महर्षी नवल साहेब, जोधपूर अशाप्रकारे सांगीतिक गुरुजन, सर्वांचे शुभाशीर्वाद व सद्गुरू कृपा यामुळे हे सर्व शक्य झाले असे डॉ.श्री सचिन कचोटे म्हणतात. अनेक विद्यार्थ्यांना बहुमोल असे मार्गदर्शन करून तरबेज शिष्य तबला वादक सरांनी घडविले आहेत. त्याचप्रमाणे संगीत कार्यशाळा, मार्गदर्शन शिबिरे यातून संगीत कलेचा प्रचार, प्रसार करत संगीत कलेची सेवा गुरुजी खूप तळमळीने करत आहेत, त्यांच्या या सर्व सांगीतिक प्रवासाबद्दल आणि कर्तृत्वाबद्दल सर्व स्तरातून कौतुक आणि शुभेच्छाचा वर्षाव होत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

19 − eleven =