मुंबई :
अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम भलेही पाकिस्तानमध्ये राहू मोठी संपत्ती गोळा करत असेल पण त्याची भारतातील संपत्ती मात्र आता विक्रीच्या मार्गावर आहे. दाऊद इब्राहिमशी संबंधित संपत्तीची ही आतापर्यंतची सर्वात मोठी विक्री असणार आहे. स्क्वेअरफीटने दिलेल्या वृत्तानुसार, स्मगलर्स अॅण्ड फॉरेन एक्स्चेंजमॅनिप्युलेटर्सकडून या संपत्तीचा लिलाव होणार आहे. १० नोव्हेंबरला ई-लिलाव, टेंडर तसेच, सार्वजनिक लिलावाच्या माध्यमातून संपत्तीची विक्री होईल. लिलाव होणारी संपत्ती (ही संपत्ती रत्नागिरीमधील खेड तालुक्यातील कुंबके गावात आहे) सफेमाच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने ओळख जाहीर न करण्याच्या अटीवर माहिती दिली आहे की, आम्हाला याआधीच दाऊदच्या या संपत्तीचा लिलाव करायचा होता, पण कोरोनामुळे लांबणीवर टाकावे लागले होते.
अधिका-याने आम्हाला यासाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागला, असेही सांगितले आहे. व्हीडीओ कॉन्फरंन्सिंगच्या माध्यमातून लिलाव होणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.