You are currently viewing कुडाळ तालुक्यात ५ ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व…

कुडाळ तालुक्यात ५ ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व…

शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात जल्लोष…

कुडाळ :

कुडाळ तालुक्यातील ५ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने वर्चस्व राखले आहे. निकालानंतर आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी एकच जल्लोष केला. कुडाळ शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात आमदार नाईक यांचे अभिनंदन केले. यावेळी जिल्हाप्रमुख संजय पडते, जि. प. सदस्य अमरसेन सावंत, जिल्हा परिषद गट नेते नागेंद्र परब, तालुका प्रमुख राजन नाईक, तालुका संघटक बबन बोभाटे, युवा सेना जिल्हाप्रमुख मंदार शिरसाट, अतुल बंगे, राजू कविटकर, शहर प्रमुख संतोष शिरसाट, उपसभापती जयभारत पालव, वर्षा कुडाळकर, श्रेया परब, सचिन काळप, दीपक आंगणे, सुशील चिंदरकर, राजू गवंडे, नितीन सावंत, रुपेश पावसकर आदी शिवसेना प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होती.

वसोली, कुसबे-पोखरण, आकेरी, गिरगाव- कुसगाव, माड्याची वाडी या ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला असा दावा सेना पदाधिकाऱ्यांनी केला आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three + three =