सावंतवाडी
सावंतवाडी येथील जिमखाना मैदानाजवळील श्री रासाई युवा कला – मंडळ हे नवरात्र उत्सवानंतर दरवर्षी म्हणजे गेले ८ वर्षे पणदूर (ता-कुडाळ) येथील संविता आश्रमांस धान्याच्या स्वरूपात मदत करीत आहे. मंडळामार्फत वर्षभरात विविध शैक्षणिक, सांस्कृतिक, रक्तदान, रक्त तपासणी शिबिर असे नव-नवीन उपक्रम राबविले जातात. यंदाही नवरात्र उत्सव साजरा करण्यात आला होता. या उत्सवाच्या वेळी भाविकांकडून नारळ, तेल, धान्य, व अन्य जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणावर जमा झाल्या होत्या, त्यापैकी हे सर्व साहित्य ३०० नारळ, २०० कि.तांदूळ, तेल ३० लि., वाटाणे, १५ कि. उडीद डाळ, ५ कि.भाजी, बिस्किट ३, पॅकेट, फरसाण २ कि. इत्यादी असहाय, मतिमंद, व निराधारांसाठी आधार बनलेल्या पणदूरच्या संविता आश्रमांस दिले. यंदाही हा उपक्रम पुढे सुरू ठेवण्यात आला असून आगामी काळातही हीच परंपरा चालू ठेवणार असल्याचे मंडळाचे नवनिर्वाचित अध्यक्ष श्री दीपक प्रकाश लाखे व अन्य कार्यकर्त्यांनी सांगितले.
यावेळी संविता आश्रम चे समन्वयक- श्री देव सावंत, उपव्यवस्थापक -श्री आशिष कांबळे, स्टॉक मॅनेजर – वैभव राठोडेकर तसेच मंडळाचे उपाध्यक्ष – खजिनदार, अंकुश लाखे, कृष्णा लाखे, गणेश खोरागडे, रोहित लाखे, नितीन पाटील, सुनील पाटील, किरण पाटील, करण खोरागडे, दीपक पाटील, पवन पाटील, धीरज लाखे, उमेश पाटील, शुभम लाखे, सुमित पाटील इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.