You are currently viewing मत्स्य महोत्सव आयोजित कोळी नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर….

मत्स्य महोत्सव आयोजित कोळी नृत्य स्पर्धेचा निकाल जाहीर….

प्रथम क्रमांक नेहा जाधव आणि स्नेहल करमरकर याना विभागून

सावंतवाडी

सिंधू आत्मनिर्भर योजना, निलक्रांती संस्था व सावंतवाडी नगरपरिषद यांच्या माध्यमातून सावंतवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या मत्स्य महोत्सवाचे औचित्य साधत घेण्यात आलेल्या कोळी गीतावरील नृत्य स्पर्धेचा निकाल आज जाहीर करण्यात आला आहे. या स्पर्धेत जिल्ह्यातील नामवंत डान्सर यांनी सहभाग घेतला होता.

या नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांक विभागून देण्यात आला असून,नेहा जाधव आणि स्नेहल करमरकर यांनी पटकावला आहे. तर द्वितीय क्रमांक देखील विभागून देण्यात आला असून, दिक्षा नाईक व नंदिनी बिल्ये यांनी पटकावला आहे. तर तृतीय क्रमांक देखील विभागून देण्यात आला असून वैष्णवी गावडे व भक्ती जामसंडेकर यांनी पटकावला आहे. तर उत्तेजनार्थ दोन पारितोषिके ईशा गोडकर आणि सानिका सावंत यांनी पटकावली आहेत. या स्पर्धेचे परीक्षण प्राची राणे यांनी केले होते.

भाजप प्रदेश सरचिटणीस रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते या स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राजन तेली, सिंधू आत्मनिर्भर योजनेचे संयोजक अतुल काळसेकर, नगराध्यक्ष संजू परब, मत्स्य शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक, आरोग्य सभापती सुधीर आडिवरेकर, पाणी पुरवठा सभापती उदय नाईक, नगरसेवक आनंद नेवगी, नगरसेवक अँड परिमल नाईक, महिला शहर अध्यक्ष मोहिनी मडगावकर, नगरसेविका दिपाली भालेकर, नगरसेविका समृध्दी विर्नोडकर, नगरसेविका उत्कर्ष सासोलकर, युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत आदी पदाधिकारी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 + twelve =