You are currently viewing आली दिवाळी अन्न भेसळ जोमात

आली दिवाळी अन्न भेसळ जोमात

  • Post category:लेख
  • Post comments:0 Comments

*भ्रष्टाचार विरोधी जन आक्रोश समिती पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष तथा माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा संस्थापक अध्यक्ष अहमद मुंडे यांचा लेख*

*आली दिवाळी अन्न भेसळ जोमात*
**अन्न व औषध प्रशासन कोमात**

दिवाळी सण मोठा नाही आनंदाला तोटा जीवनात प्रकाशाचे महत्व सांगणारा दिव्यांचा सण म्हणजे दिवाळी होय
शरद ऋतूच्या ऐन मध्यभागी, आश्विन व कार्तिक या महिन्यांच्या संधिकालात दिवाळीचा सण येतो. आश्विन वद्य द्वादशी ते कार्तिक शुद्ध द्वितीय या दरम्यान दीपोत्सव साजरा केला जातो. सहा महिन्यांची प्रदीर्घ रात्र संपून सहा महिन्यांचा दिवस सुरु होताच त्या प्रदेशातील लोकांना नवजीवन प्राप्त झाल्यासारखे वाटत असावे आणि त्यासाठीच ते हा आनंदोत्सव करीत असावेत, असे म्हटले जाते. चौदा वर्षांचा वनवास संपवून रामचंद्र सीतेसह अयोध्येला परत आले, तो याच दिवसात. प्राचीन काळी हा यक्षांचा उत्सव मानला जायचा. अंधार दूर करून प्रकाशाचे अस्तित्व निर्माण करणारा दीप मांगल्याचे प्रतीक मानला जातो. दिव्यांच्या प्रकाशाने आपल्या जीवनातील अंधकार दूर व्हावा म्हणून हा दीपोत्सव साजरा केला जातो, अशी मान्यता आहे.
२०२२ मधील दीपोत्सवाला अवघे काही दिवस राहिले आहेत. ऑक्टोबर महिन्यात मध्यावर दिवाळी सण साजरा करण्यात येणार आहे. अनेक ठिकाणी दिवाळीचा फराळ, दिवाळीचे कार्यक्रम, दिवाळीची खरेदी यांच्या योजनांना सुरुवातही झालेली आहे. साधारणपणे वसुबारसपासून ते यमद्वितीय म्हणजेच भाऊबीजपर्यंत दीपोत्सव साजरा केला जातो. शास्त्रांनुसार, अश्विन अमावास्येला लक्ष्मी देवीच्या पूजनासह गणपती आणि कुबेराची पूजा करावी, असे सांगितले जाते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, लक्ष्मीपूजन, दिवाळी पाडवा आणि भाऊबीज नेमके कधी आहेत? ते कोणत्या दिवशी साजरे केले जातील? पाहूया
सर्वत्र दिवाळी खरेदी साठी लोकांची लगबग सुरू झाली आहे . त्यामध्ये आपल्या आपल्या परस्थिती व आर्थिक स्तरावर प्रत्येक व्यक्ती आपल्या कुटुंबाची मुलांची हौस पूर्ण करण्यासाठी आज बाजारात दिसतं आहे. त्यामध्ये असंघटित कामगार अजून काही खरेदी साठी बाहेर पडला नाही 2020/2021 पासून बिघडलेली कामांची घडी अजून पाहिजे तशी बसली नाही. हाताला काम कमी त्यामुळे पैसा कमी कामगारांना बोणसचे फसवे आश्वासन यामुळे यावेळी बांधकाम कामगार यांची दिवाळी कडू होणार का?? यांना शासनामार्फत काही आर्थिक मदत होणार कां?? याकडे केविलवाणा चेहरा करून कामगार वाट बघत आहे. आणि होणारा लाभ खरेखुरे कामगार यांना होणार कां?? हा सर्वात मोठा प्रश्न आज आ वासून उभा आहे
दिवाळी फराळासाठी कंरजा. लाडू. बुंदी लाडू. गरा लाडू. शंकरपाळी. अनारस. चिवडा. असे विविध खाद्यपदार्थ दिवाळी फराळासाठी वापरले जातात . जुन्या काळात हे सर्व खाद्यपदार्थ घरच्या शेंगतेल. करडा. सरकी. अशा विविध तेलबिया घाणयावर गाळून त्यापासून स्वच्छ आणि पोषक तेल घरच्या घरी तयार केले जात होते. दिवाळी साठी लागणारे सर्व खाद्यपदार्थ हे घरच्याघरी स्वच्छ आणि सापेक्ष असे घरच्या गृहणी स्वता करत असतं. त्यामुळे आरोग्याला कोणताही धोका नव्हता आज परस्थिती बदलली लोकांचे जीवन दगदगीचे झाले वेळ नाही . याची पोचपावती म्हणून आज सर्वत्र दिवाळी खाद्यपदार्थ विक्री करणारे मोठमोठे दुकानें लागली आणि मग खरोखरच अन्न भेसळ मुद्दा वर आला आपणं जो दिवाळी फराळासाठी खाद्य पदार्थ विकत घेतो त्याबाबत आपणं कधीही खालील बाबींचा विचार केला आहे कां?? कधी घरांत करायचं विकतचं आणायचं आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य धोक्यात घालायचे अशी काही आज फॅशन झाली आहे. आज महिलांना धुर. त्रास सहन. होत नाही यामुळे भेसळ करणारे यांचें सोन्याचे दिवस आले आहेत.
** दिवाळी खाद्यपदार्थ तयार करत असताना त्यामध्ये वापरला जाणारा कच्चा माल त्याची स्वच्छता. दर्जा. गुणवत्ता. म्हंजे * वापरले जाणारे तेल खाण्यास योग्य आहे कां? . खाद्यपदार्थ तयार कालावधी व त्याची एक्सपायरी डेट त्या पॅकेट वर आहे का?? . खाद्यपदार्थ तयार करणारे कर्मचारी यांचे मेडिकल केलें आहे कां?? नख केस कपली आहेतः कां ?? खाद्यपदार्थ करण्यासाठी वापरले जाणारे पाणी स्वच्छ आहे कां ??. खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानदार यांनी संबंधित परिसरातील ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा विक्री परवाना घेतला आहे कां??. संबंधित खाद्यपदार्थ दर्जा गुणवत्ता लोकांच्या आरोग्यासाठी हे सर्व खाद्यपदार्थ योग्य आहेत याबाबत संबंधित अन्न औषध प्रशासन विभाग यांनी तपासणी पडताळणी करून दाखला दिला आहे कां ?? अशा अनेक बाबींचा आपणं खाद्यपदार्थ खरेदी करताना कधीच चौकशी करत नाही . आजच आपल्या जवळच्या खाद्यपदार्थ विक्री करत असणारे दुकानदार यांच्याकडून दिवाळी पदार्थ खरेदी करताना विचारणा करुनच खरेदी करा . भेसळ कशी चालते त्याची माहिती पुढीलप्रमाणे.
अन्नपदार्थातील काही घटक काढून घेणे. उदा. दुधातील स्निग्धांश काढून घेणे, लवंगा- वेलदोडयातील अर्क काढून घेणे एखाद्या अन्नपदार्थात कमी प्रतीचा माल मिसळणे. उदा. गोडेतेलात करडईचे तेल मिसळणे, शुध्द तुपात वनस्पती तूप मिसळणे. अन्नपदार्थात अपायकारक पदार्थ मिसळणे. उदा. मिठाईत विषारी रंग मिसळणे.मूळ पदार्थाऐवजी बनावट माल वापरणे उदा. केशराच्या ऐवजी मक्याच्या कणसाचे रंगवलेले तुरे वापरणे. चहाच्या ऐवजी लाकडाचा भुसा रंगवून वापरणे. कायद्याने ठरवून दिलेल्या पदार्थांऐवजी दुसराच पदार्थ मिसळणे. उदा. साखर मिसळण्याऐवजी एक दुसराच गोड पदार्थ (सॅकरिन) मिसळणे. एखाद्या अन्नपदार्थात सडलेले, कुजलेले, खराब किंवा किडलेले पदार्थ असणे. एखाद्या पदार्थात विषारी अंश असणे. एखाद्या पदार्थात मर्यादेपेक्षा जास्त अयोग्य रंग मिसळलेला असणे. एखाद्या पदार्थात ते टिकवण्यासाठी मर्यादेपेक्षा जास्त रासायनिक अंश सापडणे. ठरलेल्या गुणवत्तेपेक्षा कमी गुणवत्तेचा पदार्थ असणे.
आपण रोज खातो त्या अन्नात काय काय मिसळलेले असते आणि किती कस असतो हा प्रश्‍न बर्‍याच लोकांना पडत असेल. पूर्वी बहुतेक अन्नपदार्थ गावातल्या गावात व शक्यतो घरचे घरी तयार झालेले असत. आता गहू पंजाबचा, दूध परगावचे, तांदूळ दुसरीकडचा, तर भाजीपाला तिसरीकडचा अशी परिस्थिती असते. वाहतुकीच्या सोयीमुळे अन्नपदार्थाची ने -आण आणि व्यापार सोपा झाला आहे. सामान्य ग्राहकही अन्नपदार्थांच्या दर्जाबाबत फारसा जागरूक नाही. तसेच भेसळीवर नियंत्रणासाठी असलेली तोकडी व्यवस्था यामुळे भेसळीचा प्रश्‍न आज सर्वात गंभीर होत चालला आहे
आज सर्व जिल्हा निहाय अन्न औषध प्रशासन विभागांचे कार्यालय आहे. भेसळ विरोधी. खाद्यपदार्थ स्वच्छता. खाद्यपदार्थ दर्जा . कर्मचारी यांची स्वच्छता आरोग्य. अशा विविध बाबींची तपासणी पडताळणी करूनच खाद्यपदार्थ विक्री परवाना दिला जातो. पण आज अन्न व औषध विभागाच कोमात आहे. कोठेही विभागाने तपासणी पडताळणी साठी धाड केल्याची एकही बातमी येत नाही. अशा अन्न व औषध प्रशासन अधिकारी व कर्मचारी यांना कार्यालयातून बाहेर पडून हे सर्व करण्याची गरज आहे कारण तुम्ही सुध्दा तेच खाद्यपदार्थ खाता .
अन्न भेसळ प्रतिबंधक कायदा व प्रशासन कठोर केले आहेत पण खाद्यपदार्थ विक्री करणारे यांच्या मनात कायद्याविषयी कसलही भीती नाही
अन्नपदार्थांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठीचे कायदे
अन्नपदार्थांच्या दर्जावर नियंत्रण ठेवण्यासाठी १९५४ पासून अन्नभेसळ प्रतिबंधक कायदा २०११ पर्यंत लागू होता. दि. ५ ऑगस्ट २०११ पासून अन्नभेसळ प्रतिबंधक कायद्याची जागा अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ या नवीन कायद्याने घेतली आहे. यामध्ये संपूर्ण देशभरात अन्नपदार्थांवरील नियंत्रणात सुसूत्रता आणली गेली आहे. आरोग्यास हानिकारक नसलेल्या भेसळीबाबत व कायद्यातील इतर किरकोळ अटींचे उल्लंघन करणार्‍या अन्न व्यावसायिकांना न्यायनिर्णय प्रक्रिया अवलंब करून फक्त दंड भरून सोडण्याची तरतूद या नवीन कायद्यात आहे. महाराष्ट्रात अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त हे न्यायनिर्णय अधिकारी म्हणून काम पाहतात. न्यायनिर्णय अधिकार्‍यांना रु. १० लाखांपर्यंत दंड करण्याचे अधिकार आहेत. आरोग्याला हानिकारक अशा भेसळीबाबत न्यायालयात खटले दाखल करण्याची तरतूद या कायद्यात आहे. नवीन कायद्यात अन्न निरीक्षक ऐवजी अन्न सुरक्षा अधिकारी असे नमुने घेणार्‍या व संस्थांची तपासणी करणार्‍या अधिकार्‍याला संबोधले जाते.
अन्न सुरक्षा व मानदे कायदा २००६ शिवाय अन्नपदार्थांवर नियंत्रणासाठी ऍगमार्क, बी.आय.एस., भारतीय दंड संहिता (कलम २७२, २७३) हे कायदे आहेत.
या प्रश्नाबद्दल लोकांकडून अधिक जागरूकता आवश्यक आहे आणि कायद्याची अंमलबजावणीही आमूलाग्र सुधारावी लागेल. पण आपल्याकडील जगण्याची रोजची जिकीर, शिक्षणाचा अपुरा प्रसार व अन्नधान्याच्या ठेकेदारांची ताकद व प्रचंड भ्रष्टाचार यांमुळे लोकांकडून पुरेसा प्रतिसाद मिळत नाही व भेसळ वाढतच राहते.
गेल्या दोन आठवड्यांपासून साधारणपणे १०-११ वर्षांपर्यंतची लहान मुले आजारी पडताहेत. घरोघरी आजाराचे प्रमाण वाढत आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे भेसळयुक्त दूध. ह्या भेसळयुक्त दुधामुळे लहान मुलांचे आजाराचे प्रमाण वाढले आहे आणि ह्या प्रकाराला थांबविणे अक्षरशः कठीण झालेले आहे. असे खूपच कमी दूध विक्रेते असतील की जे स्वतः बाजारात विकले जाणारे दूधच आपल्या घरी सुद्धा वापरत असतील. शक्यतोवर अशी दूध विक्रेते मंडळी स्वतःच्या वापरासाठी दूध वेगळे काढून ठेवतात. अचानकपणे वातावरणात झालेला बदल आणि गेल्या काही दिवसांपासून आलेला तीव्र उन्हाळाही आरोग्यावर परिणाम करतो. उष्ण वातावरणात गाई-म्हशीचे दूध आटून जाते व दूधाचे उत्पादन घटते. दूध विक्रेत्यांच्या रोजच्या दूध वाटपावर त्याचा परिणाम होतो. अशा मुळे त्यांचे व्यावसायिक नुकसान होते, हे नुकसान होवू नये म्हणून गायी-म्हशींना हार्मोन्सची (संप्रेरके) इंजेक्शन्स देण्यात येतात. ह्या इंजेक्शन्समुळे गायी-म्हशींच्या शरीरात अक्षरशः रक्त आटवून दूध बनण्याची प्रक्रिया सुरू होते. अशा प्रकारचे दूध पिण्यात आल्यामुळे लहान मुलांचे पोट बिघडून मुले आजारी पडतात. असे दूध त्यांच्या शरीरात गेल्याने मुलांच्या हार्मोन्समध्ये सुद्धा बदल होतात. सरासरी ५०% पेक्षा जास्त मुले अशा कारणांमुळे आजारी पडतात.
निसर्गाचे, प्राणिमात्राचे समतोल देखिल बिघडत चालले आहे. अशा हार्मोन्स इंजेक्शन्स दिलेल्या जनावरांचे मांस खावून गिधाडांची प्रजातीच नष्ट होणाच्या मार्गावर आहे. आपली मनुष्य प्रजाती सुद्धा अशा भेसळयुक्त अन्न सेवांमुळे नक्कीच प्रभावित होत असून, एक दिवस नष्ट होवून जाऊ शकते. दूध किंवा अन्य पदार्थांमधील भेसळ शोधून काढणे हे काही खूप कठीण काम नाही. आयटीचा योग्य वापर करून आपण चांगली सेन्सर्स, यंत्रे निर्माण करू शकतो आयटी क्षेत्रामध्ये तेवढी क्षमता नक्कीच आहे की अशा सेन्सर्सद्वारे आपण घरीच दूध किंवा अन्य पदार्थांमधील भेसळ शोधून काढू शकतो. परदेशात अशी सेन्सर्स व यंत्रणा अगदी सहजपणे उपलब्ध होतात. मला खंत वाटते की, आपल्याकडे भेसळयुक्त अन्नपदार्थ शोधून काढण्यासाठी टेक्नॉलॉजीचा मुळीच वापर होत नाही. अन्नपुरवठा विभागाला सुद्धा ह्या विषयी अजिबात गांभीर्य नाही. आपल्याकडील द्राक्षे, केळी, आंबे, डाळिंबे आदी फळांची कमी किंवा बंद झालेली निर्यात हा सुद्धा एक चिंतेचा विषय आहे. त्याचे प्रमुख कारण म्हणजे मोठ्या प्रमाणावर होणारी कीटकनाशकांची फवारणी. अशी फळे मनुष्यांसाठी खाण्या योग्यच राहत नाही, दूध तर खूप लांबची गोष्ट आहे. आपण सर्वांनी मिळून ही भेसळ रोखली पाहिजे आणि ह्याकामी टेक्नोलॉजीचा वापर करणे ही काळाची गरज आहे
हवामानातील बदल, प्रदूषण, अन्नपदार्थांमधील भेसळ आदी बाबींचा एकत्रित परिणाम म्हणजे मनुष्यांची कमी होत जाणारी रोगप्रतिकारशक्ती, हा एक गहन चिंतेचा विषय आहे. भेसळयुक्त, दूषित अन्न व पेय पदार्थांमुळे विषबाधेच्या (फूड पाँईझन) सुद्धा घटना घडतात. आपण सर्वांनी वरील सर्व गोष्टींची तातडीने दखल घेवून भेसळयुक्त अन्न व पेयपदार्थ प्रकर्षाने टाळलीच पाहिजेत. आजारी पडून उपचार घेण्यापेक्षा आधीच काळजी घेणे केव्हाही चांगले. यासाठी आपण हस्तस्पर्शरहित फळे, अन्न व पेय पदार्थांच्या दिशेने वाटचाल करावयास हवी. आपण सुटे दूध जेव्हा स्थानिक लोकांकडून विकत घेतो तेव्हा त्यामध्ये भेसळीची शक्यता खूप अधिक असते. विशेषतः लहान मुलांसाठी आपण मानवी हस्तस्पर्शरहित शुध्द, निर्भेळ आणि प्रकृतीला पोषक (हायजीन) अशा दुधालाच प्राधान्य दिले पाहिजे. या व्यतिरिक्त आपण आपल्या व भावी पिढीच्या सुरक्षित व सुदृढ आरोग्याकरिता सेंद्रिय फळे, भाज्या व धान्याच्या सुद्धा आग्रहाने वापर केला पाहिजे. येत्या काळामध्ये स्वयंचलित आणि मानवी हस्तस्पर्शरहित अन्न व पेय पदार्थांची बाजारपेठ नक्कीच भरभराटीस येणार आहे.
बांधकाम कामगार व इतर श्रमजीवी कर्मचारी युनियन इस्लामपूर
रूग्ण हक्क व अधिकार समिती सांगली जिल्हा
रेशन अधिनियम कायदा २०१३ रक्षक समिती सांगली जिल्हा
माहिती अधिकार नियोजन समिती सांगली जिल्हा
मौलाना आझाद विचार मंच सांगली जिल्हा
भ्रष्टाचारविरोधी जनआक्रोश महाराष्ट्र राज्य पश्चिम महाराष्ट्र उप अधक्ष
संस्थापक अध्यक्ष अहमद नबीलाल मुंडे
९८९०८२५८५९

 

 

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*
————————————————
_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (Notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_
—————————————————-
*वेबसाईट :*
www.sanwadmedia.com
==========================
*फेसबुक पेज :*
https://www.facebook.com/Snvadmedia
========================
*इन्स्टाग्राम पेज :*
https://www.instagram.com/sanvadmedia/
========================
*ट्विटर :*
https://twitter.com/@MediaSanwad
=========================
*चॅनेल :*
https://www.youtube.com/c/sanvadmedia
=========================
*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क :*
*9421234663*

प्रतिक्रिया व्यक्त करा