You are currently viewing नवलराज काळे यांची ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच पदी बिनविरोध निवड

नवलराज काळे यांची ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच पदी बिनविरोध निवड

*नवलराज काळे यांची ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे उपसरपंच पदी बिनविरोध निवड*

*मंत्री नितेश राणे साहेब यांच्या नेतृत्वाखाली ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे चा विकास करण्यास कटिबद्ध राहणार नवनिर्वाचित उपसरपंच नवलराज काळे यांचे प्रतिपादन*

*वैभववाडी-*
ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे च्या उपसरपंच श्री नवलराज सुरेखा विजयसिंह काळे त्यांची बिन विरोध निवड झाली आहे. कष्ट संयम प्रेम विरोधकांना न संपवता विरोधकांच्या मनातील विरोध संपून गावाच्या प्रत्येक व्यक्तीच्या मनात अधिराज्य गाजवणारे मनमिळावू गावच्या विकासात मोलाचा वाटा देणारे गावचे जागृत लोकप्रतिनिधी सर्वसामान्यांचा आवाज, गेले साडेसात वर्षामध्ये ग्रामपंचायत सदस्य या पदावरती कार्यरत राहून त्यांनी जनतेची सेवा केली त्या सेवेची जनतेला ग्रामपंचायत कार्यकारणी कडून उपसरपंच पदाची निवड करून त्यांच्या कामाची पोच पावती देण्यात आली.
जिद्द कसोटी संयम आणि आपल्या कामात सातत्य ठेवून कोणत्याही पदाची अपेक्षा न करता जनतेची सेवा हीच ईश्वर सेवा व देऊ शब्द पूर्ण करू ह्या ब्रीद वाक्याशी एकनिष्ठ राहून सडूरे शिराळे गावाला सर्वोच्च पदाकडे नेण्यासाठी अहोरात्र प्रयत्न करणारे भारतीय जनता पार्टी चे युवा नेतृत्व सन्माननीय नवलराज काळे यांची उपसरपंच पदी निवड होणे म्हणजे या ग्रामपंचायत मधील एक ऐतिहासिक निवड मानली जाते.
. योग्य व्यक्तीची निवड ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळे मध्ये झाली असून येणाऱ्या काळात निश्चितपणे विकासाला गती मिळेल असा विश्वास गावातील ग्रामस्थांकडून व्यक्त केला जात आहे. लहानांपासून ते थोरांपर्यंत सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे सन्माननीय नवलराज हे गावातील युवकांसाठी प्रेरणादायी ठरत आहे आपला व्यवसाय आपले कुटुंब सांभाळत गावच्या राजकारणामध्ये सक्रिय राहत गावच्या विकास कामांना चालना देण्याचे काम त्यांच्या हातातून घडत आहे. येणाऱ्या काळात ते गावाचा पूर्ण विकास करतील असा गावातील जनतेला विश्वास आहे.
यावेळी बोलत असताना नवलराज काळे यांचे वडील विजयसिंह काळे यांनी माझ्या मुलाला सामाजिक कार्यासाठी मी मार्गदर्शन केले किती उंच भरारी घेतली तरी त्याचे दोन्ही पाय जमिनीवरतीच राहतील अशा प्रकारची शिकवण मी त्यास दिली आहे त्यामुळे सर्वसामान्यांचा आवाज बनून तो जनतेची सेवा करेल जनतेने दिलेले आशीर्वाद व कार्यकारणीने दिलेले बिनविरोध निवड ही त्यांनी केलेल्या कार्याची पोचपावती आहे निश्चितपणाने आपल्या सर्वांचे सहकार्याने तो गावचा विकास करेल असा विश्वास नवलराज काळे यांचे वडील विजयसिंह काळे यांनी व्यक्त केला.
मंत्री नितेश राणे यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून ग्रुप ग्रामपंचायत सडूरे शिराळेचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी कटबद्ध राहणार असल्याचे नवनिर्वाचित उपसरपंच श्री नवलराज काळे यांनी सांगितले. अनेकांचे सहकार्य या निवडीबद्दल मिळाले ग्रामपंचायत कार्यकारणी व जनतेचे त्यांनी आभार व्यक्त केले.त्याचबरोबर इतर सर्व सहकाऱ्यांचे त्यांनी आभार व्यक्त केले. अनेकांनी शुभेच्छा पर भाषण केल्यात.
काळे यांच्या निवडी बद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
या वेळी वैभववाडी तालुक्याचे गटविकास अधिकारी आर डी जंगले,भाजप चे प्रभारी माजी सरपंच विजय रावराणे, भारतीय जनता पार्टीचे खांबाळे पंचायत समिती शक्ती केंद्रप्रमुख प्रकाश पाटील, सरपंच दीपक चव्हाण, नवनिर्वाचित उपसरपंच नवलराज काळे, ग्रामपंचायत सदस्य रोशनी बाणे, प्रियंका पाटील, विलास जंगम, विशाखा काळे, माजी तंटामुक्ती अध्यक्ष विठ्ठल काटे, माजी पोलीस पाटील प्रकाश रावराणे, ग्रामसेवक प्रशांत जाधव, बाबुराव, श्री विजयसिंह काळे, सौ सुरेखा काळे, मंगेश काळे, वंदना जंगले, अथर्व जंगले, अश्विनी पटकारे, आकाराम बोडेकर, ललित रावराणे, केदार रावराणे,दिलीप भाबर, मंगेश उर्फ बंटी राणे, सागर मेजारी,सुनील राऊत, अशोक पाटील, प्रशांत बोडके,सुनील रावराणे अभय राणे, मुकेश सुतार व इतर ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा