*दक्षिण मुंबईत भाजपचा खासदार निवडून आणणार – केंद्रीय मंत्री नारायण राणे*
मुंबई :
शुक्रवार दि १६ ऑक्टोबर २०२२ रोजी लोकसभा मतदार संघ प्रवास कार्यक्रमात केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी बाबूलनाथ मंदिर येथे दर्शन घेऊन प्रवासाला सुरुवात केली. दक्षिण मुंबईत गिरगाव येथे संघटनात्मक बैठक घेऊन जिल्हयातील पदाधिकारी आणि महिला मोर्चा पदाधिकारी यांच्याशी संवाद साधला. त्यानंतर शिवडी विधानसभेतील पदाधिकाऱ्यांशी व सरकारी योजनेतील लाभार्थी नागरिकांशी चर्चा केली तसेच विभागातील पत्रकार, डॉक्टर, अड़वोकेट, अभियंता, उद्योजक, समाजसेवक, चार्टर्ड अकाऊंटंट अश्या प्रतिष्ठित मतदारांशी संवाद साधला आणि विभागातील समस्या जाणून घेतल्या. रात्री वरळी विधानसभेत राणे यांनी झंझावाती दौरा करत बीडीडी चाळ 83 येथे नागरिकांशी आणि भाजपच्या प्रमुखांशी संवाद साधला. या कार्यक्रमात भाजपा मुंबई अध्यक्ष श्री आशिष शेलार, भाजपा मुंबई महामंत्री श्री संजय उपाध्याय, दक्षिण मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री शरद चिंतनकर तसेच विभागातील सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.