You are currently viewing राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाची अंतिम सामन्यात धडक…

राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाची अंतिम सामन्यात धडक…

वेंगुर्ले

बुलढाणा येथील २३ व्या राज्यस्तरीय रस्सीखेच स्पर्धेत सिंधुदुर्ग संघाने विजयी सलामी देत अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. रविवार १६ ऑक्टोंबर रोजी अंतिम सामना होणार आहे. सहाशे किलो वजनी गटात सिंधुदुर्ग संघाने चंद्रपूर विरुद्ध विजय मिळाला, त्या नंतर कोल्हापूर विरुद्ध झालेल्या सामना बरोबरीत झाला व तिसरा सामना यजमान बुलढाणाला पराजित करून सिंधुदुर्ग संघ ने आपला दबदबा कायम राखला. आणि अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे.

या संघात विदुल पावणोजी, वैभव सोनसुरकर, सुमित नाईक, ओमकार सोनसुरकर, रामा जाधव, अमोल पारधी, तातो बांदिवडेकर, प्रशांत दळवी, सिद्धेश आजगावकर, आत्माराम पार्सेकर हे खेळाडू सहभागी आहेत.दरम्यान सर्व यशस्वी खेळाडूंचे जिल्हा रस्सीखेच संघटनेचे अध्यक्ष श्री जयप्रकाश चमणकर, मार्गदर्शक आंतर राष्ट्रीय खेळाडू सचिव श्री किशोर सोनसुरकर, श्री निलेश चमणकर, श्री हेमंत गावडे, श्री विनय गावडे, श्री हेमंत नाईक यांनी अभिनंदन केले. सिंधुदुर्ग संघास सहकार्य केले बद्दल श्री संजू परब, श्री प्रमोद नाईक, श्री प्रसाद गावडे, श्री सिध्देश् नाईक, यांचे संघटनेच्या वतीने आभार व्यक्त करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × 3 =