कणकवली (प्रतिनिधी)
भाजपा सरचिटणीस सुदन बंदीवडेकर यांच्या दुःखद निधनानंतर भाजपा नेते माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांनी फोडाघाट येथे जाऊन बांदिवडेकर कुटुंबियांची भेट घेतली. सुदन बांदिवडेकर यांची पत्नी, मुलगा साहिल, मुलगी मधुरा यांना आधार देत त्याने सांत्वन केले. यावेळी आमदार नितेश राणे, भजापा जिल्हाध्यक्ष राजन तेली, तालुका अध्यक्ष राजन चिके व स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.