You are currently viewing यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न..

यशवंतराव भोसले पॉलिटेक्निकमध्ये ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात संपन्न..

प्रतिबिंब पुस्तकाचे..’ स्पर्धेला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद..

सावंतवाडी

सावंतवाडी येथील यशवंतराव भोसले पॉलीटेक्निक मध्ये माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीप्रित्यर्थ वाचन प्रेरणा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला..
कॉलेजचे प्राचार्य गजानन भोसले व संस्थेच्या प्रशासकीय अधिकारी सुनेत्रा फाटक यांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन करून व डॉ.कलाम यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून आदरांजली वाहण्यात आली. याप्रसंगी सर्व विभागप्रमुख, शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते..


आजच्या दिनानिमित्त आपल्या आवडत्या पुस्तकाचा आशय प्रतिकृतीद्वारे मांडण्यासाठी प्रतिबिंब पुस्तकाचे या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. स्पर्धेला विद्यार्थ्यांचा तसेच शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला..
सर्व स्पर्धकांनी आपली आवडती पुस्तके व आशयाच्या कलाकृती संस्थेच्या लायब्ररीमध्ये मांडल्या होत्या. सदरचे प्रदर्शन पाहण्यासाठी सर्व विद्यार्थी व कर्मचाऱ्यांनी एकच गर्दी केली होती. स्पर्धेतील विजयी स्पर्धकांना ट्रॉफी व प्रमाणपत्राचे वाटप करण्यात आले. तसेच सहभागी सर्व स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र देण्यात आले..


कार्यक्रम यशस्वी व्हावा याकरिता कॉलेजच्या ग्रंथपाल मानसी कुडतरकर व सहाय्यक शरद घारे यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्राध्यापक अमर प्रभू यांनी केले..

प्रतिक्रिया व्यक्त करा