You are currently viewing राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

राज्याच्या राजकारणातील आताची सर्वात मोठी बातमी! शिवसेनेचं धनुष्यबाण चिन्ह गोठवलं

शिवसेना नाव देखील दोन्ही गटांना वापरता येणार नाही

 

मुंबई :

खरी शिवसेना कोणाची, यावरून शिवसेनेतील ठाकरे गट आणि शिंदे गटात न्यायालयीन लढाई सुरु असताना निवडणूक आयोगाने शनिवारी ठाकरे गटाला आणि शिंदे गटाला धक्का दिला आहे. शिवसेनेची ओळख असलेली धनुष्यबाण निशाणी गोठवण्यात आली असून शिवसेना हे नावही वापरता येणार नाही.

ठाकरे आणि शिंदे गटाकडून निवडणूक आयोगासमोर आपापले दावे करण्यात आले होते. ठाकरे गट आणि शिंदे गटाच्या दाव्यानंतर निवडणूक आयोगाची मॅरेथॉन बैठक पार पडली आणि या बैठकीत दोन्ही दाव्यांवर विचार करण्यात आला. त्यानंतर शिवसेनेचं चिन्ह धनुष्यबाण गोठवण्यात आल्याचं आयोगाकडून स्पष्ट करण्यात आलं.

तत्पूर्वी ठाकरे गटानं आज त्यांच्याकडील महत्त्वाची माहिती निवडणूक आयोगात सादर केली होती. शिवाय अंधेरी पोटनिवडणुकीत शिंदे गटाचा उमेदवारच नाही मग चिन्ह का मागतायत असा सवाल ठाकरे गटानं निवडणूक आयोगासमोर केला होता. शिवाय शिंदेंनी अद्याप उद्धव ठाकरेंच्या पक्षप्रमुख पदावर दावा केलेला नाही. त्यामुळे चिन्हाबाबतचा दावा पक्षप्रमुखांच्या परवानगीविना होऊ शकत नाही असं ठाकरे गटानं म्हटलं होतं. आमच्याकडे राजधानी दिल्लीमध्ये दहा लाखांपेक्षा अधिक शपथ पत्र तयार आहेत. अडीच लाख पदाधिकाऱ्यांची शपथपत्रे आणि दहा लाखांपेक्षा अधिक प्राथमिक सदस्यांची शपथपत्रे तयार आहेत. फक्त विहित नमुन्यामध्ये ती सादर करण्यासाठी आम्हाला चार आठवड्यांचा वेळ मिळावा. जर निवडणूक आयोगाला ती आत्ता आहे त्या स्थितीत हवी असतील तर ती पण आम्ही सादर करू, असा दावा उद्धव ठाकरे गटाचा निवडणूक आयोगासमोर केला होता.

प्रतिक्रिया व्यक्त करा