You are currently viewing झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी

झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव येथे मालवाहतूक ट्रक पलटी

चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने झाला अपघात

सावंतवाडी

मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या झाराप पत्रादेवी बायपासवर मळगाव रेडकरवाडी येथे माल वाहतूक ट्रकचा अपघात झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जिवितहानी झाली नाही. याबाबत अधिक माहिती अशी की मुंबईवरुन गोव्याच्या दिशेने माल वाहतूक करणारा ट्रक मळगाव रेडकरवाडी परिसरात पलटी झाला. चालकाला झोप आल्याने त्याचा गाडीवरील ताबा सुटून हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे. ही घटना पहाटे तीन च्या सुमारास घडली. या अपघातात कोणतीही जीवीतहानी झाली नाही. महामार्गाच्याकडेला असलेल्या झाडाना अडकून ट्रक वरच्यावरच अधांतरी राहिल्यामुळे मोठी दुर्घटना टळली मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.

प्रतिक्रिया व्यक्त करा