You are currently viewing श्री पंचम खेमराज महाविद्यालयात डॉ एस एस पाडगांवकर यांचे स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान .

श्री पंचम खेमराज महाविद्यालयात डॉ एस एस पाडगांवकर यांचे स्पर्धा परीक्षा व करिअर मार्गदर्शन या विषयावर व्याख्यान .

सावंतवाडी

श्री पंचम खेमराज महाविद्यालय सावंतवाडी येथे स्पर्धा परीक्षा आणि करिअर मार्गदर्शन कक्षाच्यावतीने ‘संशोधन पद्धती आणि करिअर’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले.यावेळी प्रमुख वक्ते प्रा. डॉ एस एस पाडगांवकर ,करिअर मार्गदर्शन कक्षाच्या समन्वयक प्रा. सौ . नीलम धुरी, प्रा. महेंद्र ठाकूर, सदस्य डॉ ए पी निकुम ,डॉ. यु.आर. पवार प्रा. व्ही जी बर्वे व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते .
स्वागत व प्रास्ताविक करिअर मार्गदर्शक कक्षाच्या समन्वयक प्रा.सौ निलम धुरी यांनी केले . समिती सदस्य प्रा. व्ही जी बर्वे यांनी प्रमुख वक्त्यांचा परिचय करून दिला. प्रमुख वक्ते प्रा. डॉ एस एस पाडगावकर यांनी याप्रसंगी मार्गदर्शन केले .

महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान सहाय्यता केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करिअर कट्टा या उपक्रमाबाबत माहिती दिली व सहभागी होण्याचे आवाहन केले.
नवनवीन विषयाचे संशोधन करण्याचा मार्ग संशोधन पध्दतीमुळे सुलभ होतो . संशोधन पद्धती हा एक अतिशय महत्त्वाचा विषय असल्यामुळे या विषयावर विद्यार्थ्यांना परिपूर्ण माहिती दिली .

करिअर मार्गदर्शन करताना त्यांनी सांगितले की करिअर करताना डोळसपणे सर्व बाबींचा विचार करून आणि योग्य मार्गदर्शन घेणे महत्त्वाचे आहे .आज उच्च शिक्षणाला स्पेशलायझेशन, स्किल बेस्ड लर्निंग तसेच मल्टि डिसिप्लिनरी अॅप्रोच या महत्त्वाच्या घटकांची जोड मिळाली आहे . प्रामुख्याने करिअर निवडताना भविष्यातील आर्थिक उत्पन्नाचे साधन हा एकच विचार केला जातो यात काही गैर नाही परंतु त्याला विद्यार्थ्यांची व्यक्तिगत आवड तसेच बौद्धिक क्षमतेची जोड मिळाली तर प्रत्येक व्यक्ती केवळ जॉब ओरिएंटेड न होता जॉब सॅटिस्फॅक्शन मिळवू शकेल. आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात इंटरनेट, करिअर वेबसाइट उपयुक्त माहिती पुरवू शकतात .
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थी माध्यमिक व उच्च माध्यमिक व पदवी परीक्षांमध्ये कोकण बोर्डामध्ये तसेच मुंबई विद्यापीठामध्ये सातत्याने अव्वल स्थान पटकावतात परंतु अशा विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षेमध्ये सहभाग व त्यामधील यशाचे प्रमाण अत्यंत अल्प आहे यासाठी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन कार्यशाळांची गरज आहे . असे मत त्यांनी व्यक्त केले. करिअर विकास कक्षाचे समन्वयक प्रा. महेंद्र ठाकूर यांनी आभार मानले या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी मोठय़ा संख्येने उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा