You are currently viewing सावंतवाडीतील “आर्या नोवा मल्टिप्लेक्स”चे उद्या उद्घाटन..

सावंतवाडीतील “आर्या नोवा मल्टिप्लेक्स”चे उद्या उद्घाटन..

तिकीट फक्त 130 रुपये; उद्घाटन प्रसंगी उपस्थित राहण्याचे गोठोस्कर यांचे आवाहन..

सावंतवाडी

कोलगाव-निरुखेवाडी परिसरात होणाऱ्या आलिशान “आर्या नोवा मल्टिप्लेक्स”चे उद्घाटन उद्या सायंकाळी ४ वाजता होणार आहे. या उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर प्रेक्षकांना तानाजी आणि हिरकणी हे दोन सिनेमे पाहण्याची संधी मिळणार आहे. त्यानंतर येत्या सोमवारपासून नियमित चित्रपट दाखवण्यात येणार आहे. त्यासाठी फक्त १३० रूपये तिकीट असणार आहे. याबाबतची माहिती मल्टिप्लेक्सचे संचालक प्रकाश गोठोस्कर यांनी दिली.
उद्या होणारे उद्घाटन बांधकाम विभागाचे निवृत्त अधिकारी प्रदिप जोशी यांच्या हस्ते होणार आहे. उद्योजक शैलेश पई, ब्राह्मण मंडळाचे अध्यक्ष राजाराम चिपळूणकर आदी यावेळी उपस्थित राहणार आहे. दरम्यान सावंतवाडी शहरात आलिशान मल्टिप्लेक्स उभारण्यात आल्यामुळे शहरांसोबत आजूबाजूच्या तालुक्यात राहणाऱ्या प्रेक्षकांना विविध चित्रपट पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे आता अन्य ठिकाणी जाण्याची गरज नाही. विशेष म्हणजे मल्टिप्लेक्स आवारात चहा-समोसा तसेच आईस्क्रीम आदी खाण्याचे पदार्थ बाजाराच्या भावात मिळणार आहे. ग्राहकांना परवडेल अशा किमतीत ही सेवा उपलब्ध करून दिली जाणार आहे. “बुक माय शो” या ॲपच्या माध्यमातून आपण ऑनलाईन बुकिंग करू शकतो. सोमवारपासून सकाळी ११ वाजता, दुपारी ३ वाजता, सायंकाळी ६ वाजता आणि रात्री ९ वाजता, असे दिवसाला ४ शो लोकांसाठी आयोजित करण्यात येणार आहेत. त्यामुळे या उद्घाटन प्रसंगी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन गोठोस्कर कुटुंबीयांच्या वतीने करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

5 × 1 =