You are currently viewing राजे प्रतिष्ठान कडून आंबोलीत शिवजयंती उत्सव उत्साहात…

राजे प्रतिष्ठान कडून आंबोलीत शिवजयंती उत्सव उत्साहात…

राजे प्रतिष्ठान कडून आंबोलीत शिवजयंती उत्सव उत्साहात…

आंबोली

येथील राजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आज शिवजयंती उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते अध्यक्ष उल्हास गावडे, माजी पंचायत समिती सदस्य संदीप गावडे, सरपंच सावित्री पालेकर, गावकर श्रीकांत गावडे, शशीकांत गावडे, प्रकाश गावडे,बबन गावडे, जगन्नाथ गावडे,गेळे सरपंच सागर ढोकरे,हेमंत ओगले,बाळकृष्ण तेंडुलकर,शांताराम गावडे,अर्जुन गावडे, हायस्कूल चेप्राचार्य विठ्ठल मोरे,शिवा गावडे, शंकर चव्हाण,मायकल डिसोझा,शांताराम पाटील,डी. पी.सावंत सर, श्री.कोल्हे, देवसु सरपंच रुपेश सावंत,काशीराम गावडे, सुशील तावडे,रोहित गावडे, भिसाजी गावडे तसेच प्रतिष्ठान चे सर्व सदस्य, महिला,विद्यार्थी,ग्रामस्थ शिवप्रेमी उपस्थित होते.

यावेळी व्यासपीठावरील सर्वांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.अध्यक्ष उल्हास गावडे, तसेच प्रतिष्ठान सदस्य यांचाही सत्कार करण्यात आला.डी. पी.सावंत सर,प्राध्यापक रुपेश पाटील,संदीप गावडे यांचाही शिवाजी महाराजांची प्रतिमा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.चित्र प्रदर्शन ठेवण्यात आले.शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम,हळदी कुंकू कार्यक्रम करण्यात आला.संध्याकाळी राममंदिर पर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली.निवेदन प्रसाद गावडे यांनी केले.पालकमंत्री रवींद्र चव्हाण आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी मोबाईलवर संपर्क साधून शुभेच्छा दिल्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 × one =