You are currently viewing कणकवलीतील क्रीडा सुविधा केंद्राचे लोकार्पण लवकरच

कणकवलीतील क्रीडा सुविधा केंद्राचे लोकार्पण लवकरच

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, नगरसेवकांसह,
मुख्याधिकाऱ्यांकडून पाहणी!

कणकवली

येथील नगरपंचायत च्या वतीने कणकवली शहरात साकार झालेले टेंबवाडी रोडवरील क्रीडा सुविधा केंद्र लवकरच कणकवली शहरवासीयांच्या सेवेत दाखल होणार आहे. या क्रीडा सुविधा केंद्र मध्ये मॅटिन बसवण्याचे काम येत्या आठ दिवसात पूर्ण होईल. अशी माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. त्या दृष्टीने कणकवली नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासह नगरसेवकांनी आज या क्रीडा संकुलाची पाहणी केली. तसेच मॅटिन बसवण्याचे काम हे जलद गतीने पूर्ण करून या क्रीडा सुविधा केंद्राच्या परिसरातील सफाई देखील तातडीने करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या. कणकवली नगरपंचायत च्या माध्यमातून कणकवली शहरातील आरक्षण क्रमांक 27, 28 हे विकसित करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. एकूण 74 गुंठे असलेल्या या आरक्षणामध्ये क्रीडा सुविधा केंद्र व गार्डन ही सुविधा कणकवली शहरवासीयांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. मात्र निधी उपलब्धतेनुसार फेज 1 मध्ये क्रीडा सुविधा केंद्राचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. यामध्ये 13 गुंठे क्षेत्रामध्ये गार्डन व उर्वरित 61 गुंठे क्षेत्रामध्ये क्रीडा संकुल व अन्य सुविधा या ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. फेज 1 मध्ये क्रीडा संकुल व स्वच्छतागृहाचे काम पूर्ण होत आले असून, मॅटिन बसवल्यानंतर हे काम लोकार्पण करण्याकरिता लवकरच सज्ज होणार आहे. फेज टू मध्ये स्विमिंग टॅंक, रनिंग ट्रॅक यासह अन्य कामे मार्गी लावण्यात येणार आहेत. मात्र याकरिता जवळपास 10 कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता असून आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे या निधीची मागणी करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी दिली. आज केलेल्या पाहणी दरम्यान मॅटिन बसवण्यापूर्वी या क्रीडा सुविधा केंद्राच्या आतील भागामध्ये कुशन बसवण्याचे काम पूर्ण झाले असून, आता येत्या 8 दिवसात मॅटिन बसवण्याचे काम देखील पूर्ण होणार आहे. कणकवली नगरपंचायत करिता या कामासाठी फेज 1 मध्ये नागरी सहाय्य योजनेमधून 4 कोटी 60 लाख व उर्वरित कामाकरिता नागरी सहाय्य योजनेमधूनच 25 लाख असा एकूण 4 कोटी 85 लाख रुपयांचा निधी या कामासाठी मंजूर झाला होता. ही बहुतांशी कामे मार्गी लागली असल्याने आता कणकवली वासियांना बहुप्रतीक्षित असलेल्या या क्रीडा सुविधा केंद्राचे लोकार्पण केले जाणार आहे. या क्रीडा सुविधा केंद्रात बॅडमिंटन सोबतच कबड्डी स्पर्धा देखील भरवता येणार आहेत. तसेच पंचांसाठी स्वतंत्र बैठक व्यवस्था व प्रेक्षक गॅलरी देखील या ठिकाणी तयार करण्यात आली आहे. जेणेकरून राज्यस्तरीय स्पर्धा देखील या ठिकाणी घेणे सहज शक्य व्हावे या दृष्टीने या क्रीडा सुविधा केंद्राची रचना केली गेली आहे. आज नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, व मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्यासोबत नगरसेवक ऍड. विराज भोसले, बंडू गांगण, विभव करंदीकर, सचिन नेरकर आदी या क्रीडा सुविधा केंद्राच्या पाहणी दरम्यान उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा

17 − four =