You are currently viewing सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेत ‘विशाल श्री २०२२‘ किताब मालवणच्या गणेश सातार्डेकर ने पटकावला

सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेत ‘विशाल श्री २०२२‘ किताब मालवणच्या गणेश सातार्डेकर ने पटकावला

वेंगुर्ला :

वेंगुर्ला येथे भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘विशाल श्री‘ ही सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेत ‘विशाल श्री २०२२‘ हा किताब फिटनेस वॉरिअर मालवणच्या गणेश हनुमंत सातार्डेकर याने पटकाविला. तर एम्पाअर व्यायामशाळा कुडाळच्या विपुल सुरेश करलकर याने ‘मोस्ट इंम्प्रुव्हड बॉडी बिल्डर‘ आणि श्री सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ल्याच्या चंदन वासुदेव कुबल याने ‘बेस्ट पोझर‘ हे किताब पटकाविले. तसेच मेन्स फिजिक किताब टीम शिवाजी सावंतवाडीचे नंदकिशोर श्यामसुंदर गावडे यांनी पटकाविला.

भाजपा युवा नेते विशाल परब यांच्या वाढदिवसानिमित्त मधूसुदन कालेलकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या विशाल महोत्सवातील ‘विशाल श्री‘ ही सिंधुदुर्ग जिल्हा खुली शरिरसौष्ठव स्पर्धेच्या रंगमंचाचे दीपप्रज्वलन करुन युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष भाई सावंत यांच्या हस्ते तर माजी नगराध्यक्ष दिलीप गिरप यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून उद्घाटन झाले. तर जिल्हास्तरीय शरिरसौष्ठव स्पर्धेचे उद्घाटन मांद्रे-गोवा येथील विधानसभा मतदार संघाचे आमदार जीत आरोलकर यांच्या हस्ते झाले. यावेळी उपस्थित मान्यवरांत विशाल परब , सावंतवाडी चे नगराध्यक्ष संजु परब , विशाल परब मित्रमंडळाचे प्रसन्ना उर्फ बाळू देसाई, प्रणव वायंगणकर, साई भोई, भाजपा तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, साईप्रसाद नाईक, वसंत तांडेल, प्रितेश राऊळ, संतोष गावडे, शिरोडा सरपंच मनोज उगवेकर, रेडी सरपंच रामसिग राणे, कुशेवाडा सरपंच निलेश सामंत, परबवाडा सरपंच विष्णू उर्फ पपू परब, ओरोस मंडल अध्यक्ष दादा साईल, कुडाळ मंडल अध्यक्ष विनायक राणे, युवा मोर्चाचे प्रसाद पाटकर, मच्छिमार नेते दादा केळुसकर , निशांत तोरसकर , अॅड. अनिल निरवडेकर , सुरेंद्र चव्हाण , प्रशांत खानोलकर , बाबली वायंगणकर आदी मान्यवरांचा समावेश होता. यावेळी जिल्ह्यातील वीस जीम मालकांचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या स्पर्धेचे खास आकर्षण म्हणजे यावेळी मिस्टर वर्ल्ड, मि. आशिया, मि. इंडीया, व महाराष्ट्र श्री चॅम्पियन पूणे येथील महेंद्र चव्हाण यांचा बॉडी बिल्डिंग शो, तसेच मि.वर्ल्ड, मि. आशिया, टॉपफायनालिस्ट, मि. ऑलिफिक अॅमिचल मंगेश गावडे मुंबई या दोन सेलिब्रिटींजचा बॉडी बिल्डिंग शो संपन्न झाला. ही जिल्हास्तरीय स्पर्धा खुली असल्याने व कोणत्याही असोसिएशनशी निगडीत नसल्याने जिल्ह्यातील स्पर्धक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

ही स्पर्धा ५५ , ५५ ते ६०, ६० ते ६५, ६५ ते ७० , ७० ते ७५, व ७५ किलो वरील अशा वजनी गटात संपन्न झाली. या स्पर्धेसाठी ३०००, २५००, २०००, १५००, व १०००, अशी बक्षिसे प्रत्येक गटांसाठी ठेवण्यात आली होती. तसेच मेन फिजीकसाठी ३५००, ३०००, २५००, २०००, १५००, व १००० अशी सहा बक्षिसे तसेच बेस्ट पोझर २५००, मोस्ट इंपो २५००, व बॉडी बिल्डिंग चॅम्पियनशिप साठी १० हजारचे पारितोषिक अशी पारितोषिके तसेच या स्पर्धेतील विजेत्यांना ट्राॅफी व मेडल वितरीत करण्यात आली.

या स्पर्धेचा गटनिहाय निकाल पुढीलप्रमाणे – ५५ किलोगटाखालील-आनंदा हनुमंत राऊळ (एनएफए अॅकॅडमी), राहूल अरविद नाईक (ओमसाई दोडामार्ग), भिकाजी दयानंद परब (प्रो फिटनेस वेंगुर्ला), चंदन वासुदेव कुबल (सातेरी व्यायाम शाळा वेंगुर्ला), सेलविया जॉकी फर्नांडी (ओमसाई दोडामार्ग), ५५ ते ६० किलो वजनी गट – विपूल सुरेश करलकर (एंपायर कुडाळ), शंकर प्रकाश माने (पॉवर हाऊस कणकवली), शेखबहादूर भोकते (यश फिटनेस सावंतवाडी), यासीन सद्दीन आजगांवकर (गावडे फिटनेस तळवडा), हितेंद्र दत्तात्रय कदम (बांदेश्वर फिटनेस बांदा), ६० ते ६५ किलो वजनी गट – गणेश हनुमंत सातार्डेकर (फिटनेस वॉरिअर मालवण), ओम सुरेश सावंत (टीम शिवाजी सावंतवाडी), निकेत विठोबा चव्हाण (पॉवर हाऊस कणकवली), ओंकार लहू केळुसकर (फिटनेस वॉरिअर मालवण), भुषण गजानन खोत (फिटनेस वॉरिअर मालवण), ६५ ते ७० किलो वजनी गट – रामदास राजन राऊळ (टीम शिवाजी सावंतवाडी), राजेश कृष्णा हिरोजी (प्रो फिटनेस वेंगुर्ला), गणेश नरेंद्र सरवंजे (तेंडोलकर जीम कुडाळ), सुरज सुरेश साळगावंकर (गावडे फिटनेस तळवडा), शुभम परब (कुडाळ), ७० ते ७५ किलोवजनी गट-धर्मपाल मंगेश जाधव (गावडे फिटनेस तळवडा), ज्ञानेश्वर आळवे (कुडाळ), लुईस फ्रांन्सीस कार्डोज (वॉरिअर जीम मालवण).

या स्पर्धेत मेन्स फिजिकमध्ये प्रथम सहा क्रमांकात नंदकिशोर श्यामसुंदर गावडे (टीम शिवाजी सावंतवाडी), भुषण गजानन खोत (फिटनेस वॉरिअर मालवण), प्रणय जयराम गावडे (सातेरी जीम वेंगुर्ला), गणेश नरेंद्र सरवंजे (तेंडुलकर जीम कुडाळ), चंदन वासुदेव कुबल व योगेश कृष्णा केरकर (दोन्ही सातेरी जीम वेंगुर्ला) यांचा समावेश आहे.

या स्पर्धेसाठी पंच म्हणून कोल्हापूरचे संजय धुरी, गौतम कांबळे, सावंतवाडीचे सुधीर हळदणकर, कणकवलीचे विक्रांत गाड, कुडाळचे सुरज तेंडोलकर, वेंगुर्ल्याचे अमोल तांडेल, हेमंत नाईक, संतोष परब यांनी काम पाहिले. या स्पर्धेचे प्रास्ताविक ‘महाराष्ट्र श्री‘ विजेते किशोर सोन्सुरकर यांनी, सूत्रसंचालन बादल चौधरी, निलेश गुरव आणि काका सावंत तर आभार माजी नगरसेवक प्रशांत आपटे यांनी मानले. या स्पर्धेचा जिल्ह्यातील युवाईंनी आनंद लुटला.

प्रतिक्रिया व्यक्त करा