You are currently viewing द्विभुज गणेश

द्विभुज गणेश

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या लेखिका कवयित्री सौ आदिती मसुरकर लिखित अप्रतिम अभंग रचना*

*द्विभुज गणेश*

प्रगटला देव । रेवती नगरी ॥।
अरबी सागरी । गजानन ॥ १॥

देखणी सुरेख । द्वीभूज ती मूर्ती ॥
देई आम्हा स्फूर्ती । लंबोदर ॥ २ ॥

आशिर्वाद देण्या । स्वप्नी देव आला ॥
वाही त्याला माला । भक्तगण ॥ ३ ॥

भक्तांच्या हाकेला । देवा तू धावसी ॥
आम्हाला पावसी । गजमुखा ॥ ४ ॥

वाहते चरणी । जास्वंद फुलांची ॥
जुडी ती दुर्वांची । विघ्नेश्वरा ॥ ५ ॥

*✒️© सौ आदिती मसुरकर*
*कुड़ाळ, सिंधुदुर्ग*

प्रतिक्रिया व्यक्त करा