You are currently viewing लाच घेताना दाभोळे गावचे तलाठी उत्तम कदम यांना रंगेहात पकडले

लाच घेताना दाभोळे गावचे तलाठी उत्तम कदम यांना रंगेहात पकडले

देवगड:

देवगड तालुक्यातील दाभोळे गावातील तलाठी उत्तम गंगाराम कदम यांना महसूल नोंद करण्यासाठी लाच घेताना लाच लुचपत प्रतिबंधक खात्याने पकडले आहे. कदम यांनी पाच हजार रुपये लाच मागितली होती. पण तीन हजार रुपये घेताना त्यांना रंगेहात पकडले आहे.

आरोपी लोकसेवक उत्तम गंगाराम कदम, तलाठी, दाभोळे जि. देवगड यांनी तक्रारदार यांच्या वडिलांचे शेतजमिनीच्या ७/१२ अभिलेखावर कुळ म्हणून नाव नोंद करण्याचा तहसीलदार देवगड यांनी दिलेल्या आदेशानुसार नाव नोंद करण्यासाठी ५००० रू. लाचेची मागणी केल्याचे आज रोजी पडताळणी अंती निष्पन्न झाले व सापळा कारवाई दरम्यान रुपये ३००० स्वीकारताना तलाठी कदम यांना १४.४५ वाजता रंगेहात पकडण्यात आले. पुढील कारवाई सुरू आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

3 × 2 =