You are currently viewing चंद्र आहे साक्षिला …

चंद्र आहे साक्षिला …

*जागतीक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री प्रा.सौ. सुमती पवार लिखित अप्रतिम काव्यरचना*

चंद्र आहे साक्षिला …

चंद्र आहे साक्षिला अन् चंद्रिका ही सोबती
अंगणात या दुधाळ धारा चंद्राच्या लागती
सोबतीस हो साथी आपला साक्षिदार सुखदु:ख्खाचा
न्हाऊ घालता शुद्ध चांदणे फुलतो मन मोराचा ….

 

शरद पौर्णिमा चंद्र चांदण्या रूपकेच प्रेमाची
टिपुर चांदणे गळते खाली मजाच त्या लेण्याची
चंद्र नि पृथ्वी जवळी येती पडे चांदणे दाट
दुध नाहते चांदव्यात हो प्यावे काठोकाठ ….

 

किरणांचा आसुसला चकोर फक्त पितो चांदणे
झाडे वेली चराचराचे चांदण्यात नाहणे
शुभ्र सडा तो धरणी वरती झरझर झरती धारा
धुक्यात जणू ती बुडून जाते वसुधा शुभ्र पसारा ….

 

स्तब्ध होते चराचर हो लागते भाव समाधी
मधुर बांसरी घुमू लागते सारे लागती नादी
धुंद होते सृष्टी सारी वाऱ्यावर डोलते
आरसपानी सौंदर्याचा अभिमान जणू मिरविते…

अमृत कलशा लक्षुमी येते ज्ञान आणि सुख शांती
को जागर्ती को जागर्ती म्हणत जोडते नाती
दुधात पडते टिपुर चांदणे होई पहा ते दिव्य
सुका मेवा घालून बनावे अमृत मधुरा पेय ….

 

प्रा.सौ. सुमती पवार नाशिक
(९७६३६०५६४२)
वेळ रात्री : ११:२७
दि: १८ ॲाक्टोबर २०२१

प्रतिक्रिया व्यक्त करा

eighteen + 6 =