You are currently viewing बांदा येथे मुस्लिम बांधवांचा ईद मिलाद उन-नबीचा सण उत्साहात साजरा

बांदा येथे मुस्लिम बांधवांचा ईद मिलाद उन-नबीचा सण उत्साहात साजरा

सावंतवाडी :

 

सावंतवाडीतील बांदा येथे मुस्लिम बांधवांचा ईद मिलाद उन-नबीचा उत्सव साजरा झाला. बांद्यातील सर्व मुस्लिम बांधवांनी हा सण मोठ्या उत्साहात आणि पूर्ण उत्साहाने साजरा केला. यावेळी बुरान गल्ली मस्जिद ते कट्टा कॉर्नर दरम्यान प्रभातफेरी काढण्यात आली. तदनंतर ओवेस कॉम्प्लेक्स इथे सर्वांसाठी अल्पोपहार ठवण्यात आला. 12 रबी-उल-अव्वल तारखेला होणारा हा सण मुस्लिम समाजासाठी खूप महत्त्वाचा असतो. ईद-ए-मिलाद म्हणजेच ईद मिलाद उन नबी हा प्रेषित मुहम्मद यांच्या जन्माच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. हा दिवस पूर्णपणे पैगंबर मुहम्मद आणि त्यांच्या शिकवणींना समर्पित आहे. हजरत मुहम्मद हे इस्लामचे शेवटचे पैगंबर मानले जातात.

या दिवशी मुस्लिम बांधव नमाज अदा करतात आणि शहरातील प्रमुख भागात मिरवणूक काढतात. याशिवाय मोहम्मद साहेबांनी दिलेले शिक्षण ते पाळतात. संपूर्ण कार्यक्रमा दरम्यान बांदा पोलिस प्रशासनाचे उत्कृष्ट सहकार्य मिळाले आणि त्याबद्दल पोलीस निरीक्षक श्री.काळे यांचे बजमे रजा बांदा कमिटीने आभार प्रकट केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा