You are currently viewing परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ला आगारातून बसेस सुरु

परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ला आगारातून बसेस सुरु

वेंगुर्ला

गणेशभक्तांच्या परतीच्या प्रवासासाठी वेंगुर्ला आगारातून दि.१५,१६ व १७ रोजी दुपारी ४ वाजता वेंगुर्ला-अर्नाळा व ४.३० वाजता वेंगुर्ला-बोरिवली बस उपलब्ध करण्यात आली आहे.

या दोन्ही बसचे ऑनलाईन बुकिंग सुरु करण्यात आले असून काही बसेस या बुक झाल्या आहेत. तसेच ग्रुप बुकिंगचीही सोय करण्यात आली आहे. प्रवाशांच्या मागणीनुसार बस उपलब्ध होतील. तसेच सायंकाळी ४.१५ वा. वेंगुर्ला आजारामार्गे पुणे वल्लभनगर ही रातराणी बस सुरु करण्यात आली आहे. या बसचे ऑनलाइन बुकिग उपलब्ध आहे. प्रवाशांनी या बसेसचा लाभ घ्यावा असे आवाहन वेंगुर्ला बस स्थानक प्रमुख निलेश वारंग यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा