You are currently viewing बिळवस येथे महिलांना नारळाच्या काथ्यावर आधारित उद्योगाचे कौशल्य विकास प्रशिक्षण

बिळवस येथे महिलांना नारळाच्या काथ्यावर आधारित उद्योगाचे कौशल्य विकास प्रशिक्षण

मालवण :

 

बिळवस येथील माजी मुख्याध्यापक श्री सुर्यकांत ज. पालव यांच्या घरी केंद्रिय सुक्ष्म, लघु तसेच मध्यम उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्या तर्फे काॅयर बोर्ड -कोचिन आणि नागरीक बहुउद्देशीय सेवा प्रतिष्ठान – सि॑धुदुर्ग यांच्या संयुक्त विद्यमाने नारळाच्या काथ्यावर आधारित उद्योगाचे कौशल्य विकास प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. सदर प्रशिक्षण दोन महिन्यांच्या कालावधीत करीता होते. या प्रशिक्षण काळात महिलांना काथ्यापासून सुंभ, दोरी, पायपुसणी, प्लावर पाॅट इत्यादी वस्तू शिकविण्यात आल्या. तसेच साबण तयार करण्याचे प्रशिक्षण देण्यात आले.

सदर प्रशिक्षणाचा उपयोग करून प्रत्येक महिलेने स्वतःचा रोजगार निर्माण करून आत्मनिर्भर, आर्थिक स्वावलंबी व्हावे अशी अपेक्षा यावेळी श्री पालव सर यांनी व्यक्त केली. सरपंच सौ मानसी पालव यांनी ग्रामपंचायत कडुन आवश्यक मदत देण्यात येईल.

या करीता महिलांनी स्वतः होऊन पुढे आले पाहिजे असे आवाहन त्यांनी केले. सौ अनुपमा पालव यांनी प्रशिक्षण काळात मोलाचं सहकार्य केले.यावेळी रेश्मा फणसे, सिद्धी पालव, रिया पालव यांनी आपले मनोगत व्यक्त केले. उपक्रमास सेवा प्रतिष्ठान -सि॑धुदुर्ग अध्यक्ष श्री अनिल गावडे व प्रशिक्षक सौ अनिता परब यांनी उत्तम प्रकारे मार्गदर्शन केले. सौ अमृता पालव यांनी आभार मानले.

या वेळी आदर्श महिला ग्रामसंघ बिळवस अध्यक्ष सौ रिया पालव तसेच प्रशिक्षणार्थी वीस महिला उपस्थित होत्या.

प्रतिक्रिया व्यक्त करा

4 − 2 =