You are currently viewing देवगड-जामसंडे युवा मोर्चा भाजपा शहर अध्यक्षपदी दयानंद पाटील; तर युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी यश रानडे यांची निवड

देवगड-जामसंडे युवा मोर्चा भाजपा शहर अध्यक्षपदी दयानंद पाटील; तर युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी यश रानडे यांची निवड

डिसेंबर मध्ये संपन्न झालेल्या देवगड-जामसंडे नगरपंचायतीमध्ये आमदार नितेश राणे यांचे खंदे समर्थक दयानंद पाटील यांना पक्षातून उमेदवारी नाकारल्याने त्यांनी प्रभाग क्रमांक १२ मधून अपक्ष उमेदवारी लढविली होती. अवघ्या २१ मताने त्यांचा शिवसेनेच्या उमेदवारांकडून पराभव झाला होता. दयानंद पाटील यांचा देवगड-जामसंडे शहरामध्ये चांगला जनसंपर्क असून वैयक्तिक रित्या व पक्षाच्या माध्यमातून त्यांनी येथील जनतेची कामे केली आहेत व पक्ष संघटना वाढीसाठी त्यांचे योगदान महत्वाचे असल्याचे जाणून पक्षाने त्यांच्यावरती देवगड-जामसंडे युवा मोर्चा शहर अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.

आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीमध्ये देवगड-जामसंडे युवा मोर्चा भाजपा शहर अध्यक्षपदी दयानंद पाटील यांची निवड करण्यात आली आहे. तर युवा मोर्चा तालुका उपाध्यक्षपदी यश रानडे यांची देखील निवड करण्यात आली आहे. संघटना वाढण्याच्या दृष्टीकोनातून नविन चेह-यांना पक्षाची पदे दिली जात आहेत. देवगड दौऱ्यात आमदार नितेश राणे यांनी त्यांना नियुक्तीची पत्रे दिली आहेत. यावेळी माजी आमदार अजित गोगटे, जिल्हा कार्यकारणी सदस्य संदीप साटम, अमित साटम, नगरसेवक शरद ठुकरुल, नगरसेविका अँड प्रणाली माने, तन्वी चांदोसकर, भाजपा पदाधिकारी उपस्थित होते. दयानंद पाटील व यश रानडे यांच्या निवडीमुळे भाजपात पदाधिकाऱ्यांकडून त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

two × five =