जिल्ह्यातील शिवसैनिक नाईकांच्या पाठीशी खंबीरपणे उभे
मालवण
लाचलुचपत विभागाकडे काहींनी तक्रार करत आमदार वैभव नाईक यांच्यावर दवाब टाकण्याचा प्रयत्न केला आहे. आमदार नाईकांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत शिवसैनिकांचे प्रेम, आशीर्वाद मिळविले असून हीच त्यांची मोठी संपत्ती आहे. लढवय्या शिलेदार म्हणून त्यांना राज्यात ओळखले जाते. याचा पोटशूळ आल्यानेच अशा तक्रारी केल्या जात आहेत. मात्र जिल्ह्यातील शिवसैनिक त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत असे शिवसेना तालुकाप्रमुख हरी खोबरेकर यांनी पत्रकार परिषदेत स्पष्ट केले.
येथील शिवसेना शाखेत पत्रकार परिषद घेण्यात आली. यावेळी उपतालुकाप्रमुख गणेश कुडाळकर, शहरप्रमुख बाबी जोगी, सन्मेष परब, अनंत पाटकर, प्रसाद चव्हाण, गौरव वेर्लेकर, किशोर गावकर, अक्षय रेवंडकर, दत्ता पोईपकर, सुरेश माडये यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.