You are currently viewing आयुर्वेद महाविद्यालयाच्या उपक्रमांतर्गत सावंतवाडीत १२ ते १४ ला मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

आयुर्वेद महाविद्यालयाच्या उपक्रमांतर्गत सावंतवाडीत १२ ते १४ ला मोफत आरोग्य तपासणी शिबीर…

अनेक व्याधींची होणार तपासणी, सात दिवसाची औषधे मोफत

सावंतवाडी

येथील राणी जानकीबाई साहेब वैदयकीय संस्थेचे रुग्णालय आणि भाईसाहेब सावंत आयुर्वेद महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार १२ ते १४ डिसेंबर या कालावधीत सकाळी ९ ते दुपारी १ वाजेपर्यंत मोफत स्थुलरोग तपासणी शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे या शिबीरात येणार्‍या रुग्णांना सात दिवसाची औषधे मोफत दिली जाणार आहेत.

ज्या रुग्णांना उच्चरक्तदाब, मधुमेह, हदयरोग गुडघ्याचे दुखणे, मलबध्दता, वेगवेगळ्या प्रकारचे त्वचाविकार, पायाच्या शिरा फुगणे, यकृताचे विकार, थॉयराईड, स्त्रियामध्ये होणारे मासिक पाळीचे विकार, वंधत्व चालताना दम लागणे आदी आजारांची तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे जास्तीत-जास्त रुग्णांनी या शिबीराचा लाभ घ्यावा, असे आवाहन संस्थेेचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर व प्राचार्य बाबासाहेब पाटील यांनी केले आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 4 =