You are currently viewing हरिणी की संहारिणी…

हरिणी की संहारिणी…

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्या ज्येष्ठ लेखिका कवयित्री सौ राधिका भांडारकर लिखित अप्रतिम काव्यरचना*

*हरिणी की संहारिणी…*

खरा रावण स्वप्नी आला
म्हणाला जाळलेस तू काल मला
अवती भवती आजही नराधम
किती असती ठाऊक आहे का तुजलाा…

पळवले जरी मी जानकीला
कधी न स्पर्श केला तिजला
स्त्रीत्वाचा मान मी राखला
कलीयुगातल्या रावणाचा भरवसा कसला…

कुणी नसणार आता लक्ष्मणासारखा
जो घालेल बंधन एका रेषेचे
म्हणून विनवितो हरिणी हो सावध
भलाबुरा तुलाच आहे ओळखायचे…

जगी माजले खोटारडे फार
नको बळी पडूस भुलथापांना
नजर त्यांची तुझ्या स्त्री देहावर
धडा शिकव दुर्गा बनून त्यांना…

सीतेच्या अंतर्शक्तीत होते सामर्थ्य
ते मिळवण्याचा प्रयत्न तूही कर
नको समजूस अबला परावलंबी
ब्रह्माचे तेज तू असती तुला अष्टकर….

माझ्यातला रावण मुक्त झाला
कधीच रामचरणी देह ठेवून
युगायुगातले रावण इकडे तिकडे
दशावतारी भयानक ठेव त्रिशूळ रोखून…

राधिका भांडारकर अमेरिका..

Advertisement

*🏡”सृष्टी क्रिएटर्स” 🏡*

*घेवून आले आहेत…! सावंतवाडी शहरात “सृष्टी आंगण फेज १” च्या भरघोस प्रतिसादानंतर आता “सृष्टी आंगण फेज २”🏘️*

*_👨‍👩‍👦 तुमच्या कुटुंबाचे शहराच्या मध्यवर्ती घराचे 🏡 स्वप्न पुर्ण करा, तेही अगदी बजेटच्या किंमतीत…!💰_*

*💎♦️आमची वैशिष्ट्ये:-👇*

*▪️मच्छीमार्केट पासून काहीशा अंतरावर…!*

*▪️ कळसुलकर शाळेच्या मागे…!*

*▪️ शहराच्या मध्यवर्ती भागात असून सुध्दा कोलाहलापासून दूर…!*

*▪️नयनरम्य नरेंद्र डोंगराच्या पायथ्याशी…!*

*▪️आल्हाददायक वातावरणात ब्रॅन्डेड कंपन्याचे मटेरीयल वापरुन बनविण्यात येणारे आलिशान फ्लॅट…!*

*▪️क्ववालीटीशी कोणतीही तडजोड न करता उभारत असलेली सुसज्ज अशी इमारत…!*

*🏃🏻‍♂️चला… तर मग आजच संपर्क करा ☎️*

*🎴आमचा पत्ता:- कळसुलकर इंग्लिश स्कुल, मच्छी मार्केट जवळ, सावंतवाडी*

*संपर्क :- श्री नीरज देसाई*
*📱९४२२०९६५६२*

*सौ. वैदेही देसाई*
*📱९४२२०७६६२०*

*Advt link*

प्रतिक्रिया व्यक्त करा