You are currently viewing रिलायन्स फाउंडेशन रत्नागिरी तर्फे गुगल मिट द्वारे मासेमार युवकांना आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन…

रिलायन्स फाउंडेशन रत्नागिरी तर्फे गुगल मिट द्वारे मासेमार युवकांना आपत्ती व्यवस्थापन मार्गदर्शन…

रत्नागिरी

दिनांक 13 ऑक्टोबर, २०२० रोजी आंतरराष्ट्रीय रिस्क रिडक्शन दिवसाच्या (आपत्ती जोखीम कमी करण्यासाठी आंतरराष्ट्रीय दिवस) निमित्ताने रिलायन्स फाउंडेशन रत्नागिरी, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग, रत्नागिरी व नेहरू युवा केंद्र, रत्नागिरीद्वारे कोरोना काळात गुगल मिट च्या माध्यमातून रत्नागिरी जिल्ह्या मधल्या मासेमार युवक, नेहरू युवा केंद्राचे युवा स्वयंसेवक यांना आपत्ती व्यवस्थापनचा कार्यक्रम पार पाडण्यात आला. रिलायन्स फाउंडेशनचे प्रकल्प व्यवस्थापक राजेश कांबळे यांनी रिलायन्स फाउंडेशन मार्फत आपत्कालीन परिस्थितीमध्ये मासेमार किंवा बाधित लोकांपर्यत माहिती व्हॉइस मेसेज, व्हाट्सअँप द्वारे कशी पाठवली जाते तसेच रिलायन्स फाउंडेशनचा हेल्पलाईन क्रमांक १८००४१९८८०० चा वापर आपत्कालीन परस्थितीमध्ये कसा केला जातो याची माहिती दिली. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक म्हणून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी, रत्नागिरी अजय सूर्यवंशी उपस्थित होते. अजय सूर्यवंशी यांनी रत्नागिरी जिल्ह्यातील संभाव्य आपत्ती व भूतकाळातील आपत्ती बद्दल माहिती दिली. तसेच निसर्ग चक्री वादळात आपत्ती व्यवस्थापन कसे केले, जिल्हा आपत्कालीन संपर्क क्रमांक याची माहिती दिली. आपत्ती व्यवस्थापन विभाग, NDRF व रिलायन्स फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने जिल्हयातील स्वयंसेवकांना शोध आणि बचाव, समुद्री सुरक्षा, CPR यांच्ये मार्गदर्शन व प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील तालुका व गाव स्थरातील स्वयंसेवकांना एकत्रित करून आपत्कालीन परिस्थितीमध्ये योग्य समन्वय व माहिती पोहचवून आलेल्या आपत्तीची तीव्रता किंवा नुकसान कमी करणे या हेतूने गाव स्थरातील मासेमार, नेहरू युवा केंद्रातील युवकांना एकत्रित करून प्रशिक्षण व मार्गदर्शन करण्यात येणार आहे. कार्यक्रमामध्ये रत्नागिरी नेहरू युवा केंद्राचे जिल्हा युवा समन्वयक मोहित कुमार सैनी यांचे मार्गदशन व सहकार्य लाभले. तसेच रिलायन्स फाउंडेशनचे कार्यक्रम सहाय्य्क चिन्मय साळवी यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. मासेमार व नेहरू युवा केंद्राच्या स्वयंसेवकाचचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

प्रतिक्रिया व्यक्त करा