You are currently viewing कोकणकन्या, मांडवी एक्प्रेस उद्यापासून विजेवर

कोकणकन्या, मांडवी एक्प्रेस उद्यापासून विजेवर

कोकण रेल्वेचे विद्युतीकरण पूर्ण झाल्याने आता या मार्गावरील राजधानी लोकप्रिय कोकणकन्या व मांडवी एक्सप्रेस उद्यापास्नू विजेच्या इंजिनावर धावणार आहेत. त्यामुळे चाकरमान्यांचा प्रवास प्रदूषणमुक्त आणि वेगवान होणार आहे.

जानेवारी 2023 पासून कोकणकन्या एक्सप्रेसला सुपरफास्टचा दर्जा देण्यात येणार असल्याने तिच्या प्रवासात दोन तास दहा मिनिटांची बचत होणार असून तिचा क्रमांकही बदलणार आहे. ट्रेन क्र.10111/10112 मडगाव-सीएसएमटी कोकणकन्या आणि ट्रेन क्र.10103 /10104 मडगाव-सीएसएमटी मांडवी एक्सप्रेस शनिवार, 8 ऑक्टोबरपासून विजेच्या इंजिनावर धावणार आहे. कोकण रेल्वेच्या 741 कि.मी.च्या मार्गाचे शंभर टक्के विद्युतीकरण मार्चमध्ये पूर्ण झाले होते. चाकरमान्यांची त्यामुळे हवा आणि ध्वनीच्या प्रदूषणातून संपूर्णपणे मुक्तता होणार आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा