You are currently viewing शहरातील अडकून पडलेली विकासकामांना तातडीने निधी मंजूर करून द्या…

शहरातील अडकून पडलेली विकासकामांना तातडीने निधी मंजूर करून द्या…

माजी आरोग्य सभापतींची पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनद्वारे मागणी..

सावंतवाडी

सावंतवाडी शहरातील अडकून पडलेली विकासकामे तातडीने मंजूर करून त्यांना निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी सावंतवाडीचे माजी सभापती तथा नगरसेवक अँड. परिमल नाईक, सु़धीर आडीवरेकर, उदय नाईक, नासीर शेख यांनी सिंधुदुर्गचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

यामध्ये त्यांनी मोती तलावाचा कोसळलेला कठडा जलद गतीने बांधण्यात यावा त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, शहरात भूमिगत गटार बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, शहरात मंजूर झालेल्या नळपाणी योजनेला तातडीने निधी उपलब्ध करून देण्यात यावा, भूमिगत विद्युत भारीत योजना तातडीने मंजूर करण्यात यावा, भटक्या कुत्र्यांची नसबंदी करण्यासाठी किंवा त्यावर तत्सम उपाययोजना करण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा, सुसज्ज पॅव्हिलीयन बांधण्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात यावा तसेच सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात तात्काळ डॉक्टरांची नियुक्ती करावी.

प्रतिक्रिया व्यक्त करा