You are currently viewing सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या जिल्हा समादेशक होमगार्ड भवनाचे लोकार्पण

सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या जिल्हा समादेशक होमगार्ड भवनाचे लोकार्पण

पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी केले उद्घाटन

सिंधुदुर्गनगरी

सिंधुदुर्गनगरीच्या सौंदर्यात भर घालणार्‍या जिल्हा समादेशक होमगार्ड भवन व प्रशिक्षण केंद्राच्या नुतन वास्तूचा शानदार लोकार्पण सोहळा पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांच्या हस्ते शुक्रवारी झाला. यावेळी जिल्हाधिकारी के मंजूलक्ष्मी, आम. नितेश राणे, आम वैभव नाईक,मुख्य कार्यकारी प्रजित नायर, जिल्हा पोलीस अधिक्षक राजेंद्र दाभाडे, राजन तेली अँड अजित गोगटे, अ आदी सह विविध खातेप्रमुख अधिकारी उपस्थित होते. अपर पोलीस अधिक्षक नितिन बगाटे यांनी प्रास्ताविकात जिल्हातील होमगार्ड चे असलेले योगदान विषद केले. कोरोना काळामुळे या ईमारतीचे उद्घाटन रेंगाळल्याचे त्यांनी सांगितले. जे काम केल नाही तरी त्या वास्तूचे उद्घाटन माझा हस्ते होतय त्याबद्दल मी भाग्यवान समजतो. त्यावेळी मुख्यमंत्री असताना देवेद्र फडणवीस यांनी या वास्तूला निधी दिला होता. व कोरोना काळात या वास्तूत गरवंत रुग्णाना या वास्तूने सेवा दिली आहे. व अनेकांचे जीव वाचवीले आहेत. त्यामुळे या वास्तूचे महत्व मोठे आहे. अशी भावनाही पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांनी व्यक्त केली

प्रतिक्रिया व्यक्त करा