You are currently viewing झाड
  • Post category:कथा
  • Post comments:0 Comments

झाड

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंच सदस्य ज्येष्ठ लेखक कवी प्रा.डॉ. जी आर उर्फ प्रवीण जोशी लिखीत अप्रतिम कथा*

*झाड*

( विनोद ग्रामीण कथा )

सांच्याच सहा वाजल, असतील नसतील तस , झाडून सर्व पंच मंडळी चावडीवर जमली . फकस्त , चेरमन जोती पाटील यांची वाट बघत सगळी जण ताटकळत बसली . कारण बी तसच हुत , बुद्रुक वाडी ग्रामपंचायतीला गव्होरमेन्ट च पैशे शानक्षेन झाल्याल . गावात रस्ते गटारी , पाणी नळ योजना महिलांसाठी स्वच्छता ग्रह बांधण्यास , बक्कळ रक्कम आल्याली त्याचा बैजवर खर्च कुणी कुठं कुठं करावा , यासाठी बैठक बोलवल्याली . तसा नोटीसीचा कागुद , नाम्या शिपाईनी घरोघरी पंचा कड फिरवुन त्यांची रीतसर सही , अंगठा पण घेतलेला . म्हणून शान कुणाला बी मिटिंग चुकवता येत नव्हती। .
मेम्बर येऊन तास झाला तरीपण चेरमनचा पत्त्या नाय . म्हटल्यावर सगळ्या मेम्बरानी, आलेला मल्लप्पा च्या हाटेल मधला चहा पिला . व चंची सोडून पान सुपारी ची देवाण घेवाण झाली . काहींनी तळ हातावर तंबाखु मळून अलगद तोंडा आड केली. तस हणमंत ने विषयाला हात घालत म्हटले , चेरमनला सांगावा धाडा , अस म्हटल्यावर सगळी फिदीफिदी हसाय लागली . या वखुता ला चेरमन कुंभार आळीतच असणार हे समद्यानी वळीकल हुत , पण बोलावणार कोण !
कुंभार आळीत शेवंता च्या घरी जाणार कोण ? अन बोलवूनशान
आणणार कोण ? तस सगळ्यांनी नाम्या शिपाई ला गळ घातली व चेरमन ला बोलवून ये अस हणमंत म्हणाला खरा , “नाई बा तीत मी जात” अस नाम्या म्हणला व सगळी परत फिदीफिदी हसाय लागली .
गजु परीट सायकली वरन कापड देण्यासाठी चालला हुता . तस एका पंचन त्याला हटीकल , गज्या इकडं ये जरा , तसा गजु चावडीच्या कट्ट्याला सायकल लावली व पायऱ्या चढत वर गेला . त्याला समदी स्टोरी सांगितली व काम बी सांगितलं . म्या नाय बा चालतोय तकड , वरच्या आळीत कापड द्यायची हाइत म्हणत , गज्याने तिथून धूम ठोकली त्याला समद म्हैत हुत च की .
काही वेळाने म्हमद्या दिसला ,तस लगेच त्याला कुंभार अळीच्या कामावर पाठवला . म्हमद्या गावातलं हाफ मॅड च , त्याच्या एडपट पणाचा फायदा घेत , त्याला एक बिडी पेटवून दिली , तस त्यो झुरका मारत मारत , शेवंता कुंभार च्या घरी पोहचला . बाहेरुन त्यांनी जोरात हाळी मारली , पाटेल साहेब म्हणताच
जोतीबा नी आपला दरबार आटोपता घेतला . क्या बे म्हमद्या काईको आया इधर , म्हणत पाटील भैर आलं म्हणाल , तु लै च येडा हाय , का अलाईस ? अस म्हणताच म्हमद्या म्हणाला , उधर चावडी मे सब लोगा तुम्हारी राह देखते बैठय . अस म्हणताच पाटलांच्या कानात गरम रस गेल्या वाणी झालं . समदा प्रकार ध्यानात आला अन पाटील म्हमद्या ला खुशीने सिगरेट देत म्हटलं , बाबा आलास लै बर झालं . माझी तर आज
इज्जत च गेली असती . पाटील कुंभार गल्लीत गेलं की त्यांना बाहेरच जगाचा इसर पडतोया , हे सगळ्यांना म्हैत हुत . पण शेवटी येड्या म्हमद्या ने हे काम फत्ते केलं . ते पण एक बिडी एक सिगारेटच्या बक्षिसावर !

तस पाटीला नी आपली एझडी गाडी वर सवार हुन चावडीत पोहचले . तो पत्तर। रातीच 8 वाजल हुत . सर्व मंडळी चा जीव भांड्यात पडला तस , यशव्दा काटे भैर पडली अन म्हणाली तुम्ही घ्या आटपून मिटिंग , मला रातच सगळा सैपाक कराय हुव . तस पाटलांनी बी तिला परमिशन दिल्या दिल्या ती तरातरा घराकडं गेली बी . ही काट्यांची यशव्दा , म्हणजे काटे गल्लीतील मेम्बर , एकमेव लेडी मेम्बर !
तस मिटिंग सुरू झाली विषय मांडला , सगळ्या ची चुळबुळ चालु झाल्याल दिसताच , पाटलांनी नाम्या ला बोलवलं . मल्लप्पा च्या हाटेलमध्ये भडंग व चहा बिस्किट ची ऑर्डर सोडताच , सगळं कसं चिडीचप्प झालं .
सगळ्यांनी तोंड धुतली , चुळा भरल्या , धोतराच्या सोग्यानी तोंड पुसली . ” भडंग चहा बिस्कीट ” नी सगळ्यांना तरतरी आली . तस चेरमनच उठले म्हणाले रस्त्याच्या दोन्हीकडच्या बाजुने गटारी कराया घ्या . त्यासाठी जेसीपी येईल. त्यांनी घराच्या दुतर्फा , चर काढून घ्या, वाटेत येतील ते झाड झुडपं काढाच . कुणाला बी सूट मिळणार नाही . कुणाचं बी ऐकायचं नाही , हे काम तुम्ही तुमच्या वार्ड मेम्बरानी करून घ्या , गावात दोन जेसीपी आलं हैती , ती उध्या पासन कामावर रुजू होतीलच . प्रत्येक मेम्बरानी जातीनं हजर राहुन हे काम दोन दिसात सम्पवाय पाहीजेल . एकदा का चर काढली की बाकीच काम , ग्राम पंचायत साहेब करतीलच , फकस्त तुम्ही , जातीनं गल्लीच्या दुतर्फा चर काढून घ्या . बाकीच आपण परत बघु, अस म्हटलं अन चेरमन आपल्या येझडी गाडीवरून निघुन गेलं ! तशी सगळी कुजबुज करीत , मेम्बर पण पांगा पांग झाली . पाच मिनिटाच्या मिटिंग ला दोन तास ताटकळत राहावं लागलं , याची नाराजी दिसुन आली. पण चहा भडंग मिळाल्याचं , आंनद पण दिसुन येत होताच .
दिस उजाडला तस सरकारी जेसीपी आला , व धडधडत रस्त्याच्या कडला खड्डा काढत सुटला . वाटेत येईल ते समद सुपडा साप करत खड्डा तयार हुत होता . वार्ड मेम्बर बी जातीनं हजर व्हतीच की . काही रिकामी टेकडी लोक गमज्या म्हणुन , इकडं तिकडं फिरत व्हती . तोंडात पान सुपारी चा तोबरा भरून , अंतरळी बोलत हुतीच . हे मातुर लै बेस काम झालं , एकदा का गटारी झाल्या की , घरातलं सांड पाणी सोडता येईल . त्यावर लगेच लक्ष्या म्हणाला व्हय व्हय तर तर , घरातली लहान पोर बी बसतील की, उठल्या उठल्या , नायतर घर समद घाण करून ठेवत्यात !
अस समद गावभर खड्डा काढून झाला , खोत आळीत होणार हुता , नेमकं त्या आळीत वरच्या अंगाला भिमाश्या च घर ! अन घराबाहेर भिंती लगट एक आंब्याचं झाड ज्याला आंबे बक्कळ लागत हुती . भिमाश्याला ही काळजी लागली हुती हे झाड आता गटारासाठी जाणार . भिमाश्या तसा डोकेबाज , त्यानं आधीच झाडाला बक्कळ तेल चोपडल व त्यावर शेंदूर फसला . व कसल्या कसल्या अनेक रंगात जुने ताईत बांधले . झाडाखाली परसात असलेली “ताईबाई ” झाडाखाली आणुन ठेवली . गावभर बोभाटा केला ही ताईबाई लै कडक हाय , नवसाला बी पावती !, अन हीच आसरा जर कुणी काढलं तर त्याच , समदच ईसकोट करती, कुणाला बी धड ठेवणार न्हाय !
झालं ही बातमी गावभर पसरली , तशी चेरमन ज्योती पाटला पर्यँत गेली . समद गावभर हीच चर्चा
बायकात बी कुजबूज चालु झाली. तशी ही गोष्ट “पाटलीनबाईच्या ”
कानावर गेली , मग काय ईचारता , झालं . पाटली ण बाई हळूच दुपारच्या वक्ताला ह्यो विषय काढला . पाटील बी नुकतंच जेवण करून , मंचा वर बसल्याल मंच पुढमाग , माग पुढं हुइत होता . पानाचा बदक डब्बा त्यांनी उघडला . पानाचा देठ खुडून दाताखाली चावत फेकून दिला . अंगठ्या नी चुना लावून
सुपारी सकट पान दाताखाली दाबलं असलं नसलं , तस पाटील वैनी म्हणाल्या , एक ईचारु का तुम्हाला . त्यावर पाटील हसले म्हणाले , त्या झाडांबद्दल च ईचारणार नव्ह ! त्यावर वैनी हसल्या , तुम्ही लै मनकवड हायसा ! समद लगीच कळतंय !
पाटील म्हणाले म्हणूनच तर आम्ही तुमच्याशी लगीन केलंय अस म्हणत , सिगारेट पेटवली व तोंडात धरून दोन तीन झुरके मारत म्हणाले , आम्ही त्याचंच इचार करतोय ! त्यावर लगेच पाटलीनबाई म्हणल्या , माझं ऐका ते झाड सोडून गटार करा . लै कडक हाय म्हण ती ताईबाई ! समद गाव च म्हणणं तसच हाय . आणखी एक म्ह्णजे त्या भिमाश्याच्या बायकूच्या अंगात येति म्हण ती ताईबाई !
पाटलांच कान सोनारानी व सोना राणी न टोचल ! तस लगेच फर्मान वाड्यातन निघालं ! त्यांनी नाम्या शिपाई ला बोलवलं अन सांगितलं असलं नसलं तस गावभर फटाकड्या उडवल्या . एवढंच नव्ह तर समदी झाडून गावातल्या बायका त्या झाडा खाली आल्या . कोण खणा नारळा न वटी भरली तर कुणी दहीभात व आंबील चा नैवेद्द दावला .
रोज पुजा अर्चा होऊ लागली . बायकांचा राबता वाढलं तस भिमाश्या च्या बायकोच्या अंगात येऊ लागलं . अंगारे धुपारे , प्रसाद फळ फळावल नारळ यांचा ढीग पडू लागला . बघता बघता गटार राहली दुरच तिथं छोटं देऊळ च बांधलं गेलं .
एक आंब्याच्या झाडाने भिमाश्याची कुंडली च बदलली , तो आता शेतीकडे न जाता तिथंच बसून राहु लागला . एक मात्र झालं त्याच “झाड “सोडुन गावात समदी कड गटारी झाल्या .

प्रो डॉ जी आर प्रवीण जोशी
अंकली बेळगाव

Advertisement

Web link

*_🏠तुमच्या स्वप्नाला वळण देणारा, एक सुंदर प्रयत्न जो बदलेल तुमच्या जीवनाला !!!!🏠_*

*⚜️”रॉयल सिटी पार्क” मुंबईतील नामांकित बिल्डर्सचा ऐश्वर्य संपन्न गृहप्रकल्प प्रत्यक्ष रत्नागिरीत !⚜️*

*▫️*वैशिषट्यपूर्ण घरकुलाची सुसज्य मांडणी आणि आधुनिक सुविधांनी परिपूर्ण वास्तूचे रूप, आपल्याला इथेच पाहायला मिळेल. मुंबई पद्धतीने बनवलेला डिलक्स फ्लॅट तोही सर्वसामान्यांना परवडेल असा. त्याच प्रमाणे *_NO GST / OC COMPLETE / READY POSSESSION._*

💫 *_आपल्या प्रोजेक्टची खास वैशिषट्ये_* 💫

*१) रेडीमेड मॉड्यूलर किचन ट्रॉलीसहित .*
*२) बाथरुम जग्वार फिटिंग, पूर्ण फ्लॅट कंन्सिल्ड इलेक्ट्रिक, ट्यूब्स, फॅन, गिझर, एक्झॉस्ट फॅन, बल्ब फिटींग,*
*३)पूर्ण फ्लॅट पी.ओ.पी मोल्डींग*
*४) वॉकिंग ट्रॅक, चिलड्रन्स प्ले गार्डन*
*५) अत्याधुनिक लिफ्ट (ISI mark)*
*६) आकर्षक इंट्रन्स लॉबी, रेन वॉटर हार्वेस्टिंग.*
*७) भरपूर पाणी , प्रशस्त पार्किंग व्यवस्था.*
*८) जवळच शाळा , मंदिर , मार्केट.*
*९) १००% गृहकर्ज सुविधा उपलब्ध.*

🌐 *प्रोजेक्टच्या अधिक माहिती साठी या लिंक वर क्लिक करा*👇🏻
https://royalcitypark.in

*☎️ बुकिंग संपर्क ☎️*

Rakhi : 9209193470.

Mahesh Bhai :9820219208.

Sharad : 8600372023.

🛑 *साईटचा पत्ता* 🛑

*रॉयल सिटी पार्क, रवींद्र नगर ,सेंट थॉमस स्कूल जवळ , (श्री स्वामीसमर्थ मठ) कारवांची वाडी, कुवारबाव रत्नागिरी*

📢 *मोजकेच फ्लॅट शिल्लक, आजच बुक करा*

प्रतिक्रिया व्यक्त करा

one + 12 =