You are currently viewing भुताखेतांच्या गोष्टी

भुताखेतांच्या गोष्टी

*जागतिक साहित्य कला व्यक्तित्व विकास मंचचे सन्माननीय सदस्य तथा संस्थापक अध्यक्ष महाकवी कालिदास प्रतिष्ठान पुणे लेखक कवी वि. ग. सातपुते लिखित अप्रतिम कथा*

 

*भुताखेतांच्या गोष्टी*

(क्रमांक :- ११ वा)

➖➖➖➖➖➖➖➖

मित्रहो ,

मागील १० नंबरच्या कथानकात ज्यांना *कर्णपिशाच्च्य विद्या* अवगत होती त्या व्यक्तीचा गावकरीच असल्यामुळे छान परिचय होता , ते सुशिक्षित असून नामवंत कार्पोरेट संस्थेत सर्विसही करत असत ..त्यामुळे नेहमी सर्वांच्याच गाठीभेटी होत असत ..(त्यांना आपण *तात्या* संबोधु .)

गांव छोटे असल्यामुळे सवड मिळेल तसे ते सर्वांच्या कड़े जात येत असत .. मला ते माझ्या वडिलांच्याच वयाचे असल्यामुळे त्यांच्या बद्दल एक आदरयुक्त भितिही होती ..कित्येक वेळा योगायोगाने ते जर कुठे निघाले असतील त्यावेळी माझी त्यांची गांठ पडली तर मी त्यांना लिफ्टहि देत असे ,असे अनेक वेळा घड़ले होते. त्यांचे अनेक किस्से आहेत ..एकदा ते सकाळीच आमच्या घरी वाड्यात आले होते . वाड्यात ओसरीवरच्या ( हॉल) बैठकीवर बसले होते .माझे वडिल ,काका त्यांचेशी बोलत होते . त्यावेळी मीही सुट्टी असल्यामुळे घरी होतो . अचानक त्यांना काहीतरी जाणवले होते ..त्यांनी कानाच्या पाळीला हात लावला , डोळे मिटले ,अन म्हणाले , अरे माजघरात धान्याच्या कणगी मागे काल रात्री पासून जनावर ( नाग) बसलेला आहे ….मारू नका , त्याला धरुन सोडून द्या ..तिथे दूध ठेवा …दूध ठेवले देखील …पण तो नाग बघणाऱ कोण ? शोधणाऱ कोण ?.

तात्या म्हणाले तुम्हाला तो काही करणार नाही ..आणी ते गेले देखील . इकडे आम्ही आमच्या गल्लीत *धाकु गुराखी* नावाची व्यक्ती होती , तीला शोधून आणले . तो जनावरे (सर्प वगैरे) पकडत असे . त्याने अगदी सहज त्या नागाला पकडले देखील आणी जवळच्या बागे मध्ये सोडूनही दिले .. रात्रीपासून तो नाग माजघरात जिथे घरातील माणसे झोपत असत तिथे होता . घरातील कुणालाही त्याची कल्पना आली नव्हती ..तात्यांना मात्र ते न दिसता , न पहाता कळले होते ..हे मात्र खरे …

तात्यांच्याकड़े आमच्याकड़े कुणी पाहुणे , नातेवाईक ,वगैरे आले मी त्यांना घेवून जात असे ..एक दिवस सासवडहुन नातेवाईक त्यांच्या मुलीला घेवून आले होते .

मुलगी ही मोठ्ठी होती , पण अर्धवट , विचित्र वागत होती तिच्या संदर्भात ते लोक आले होते ..तात्यांनी त्यांना विचारले की ही जन्मजात अशी आहे कां ? त्यांनी सांगीतले नाही , मग हा त्रास केव्हापासुन सुरु झाला ? नातेवाईक म्हणाले साधारणत: ६ महिन्यापूर्वी ती अचानक तापांने फणफणली आजारी पडली . तापात असंबद्ध बोलते ..विचित्र वागते..ओरडतेच ..यात तिची ७ वीची परिक्षाही बुडाली आहे . सर्व प्रकारची ओषधे अन्य उपाय केले पण काही उपयोग झाले नाहीत . दिवसेंदिवस हा प्रकार वाढतो आहे ..म्हणून तुमच्याकड़े आलो आहोत …ती परकरी १४ ते १५ वर्षे वयाची मुलगी तिथे होती ..तात्यांनी तीला विचारले तू कोण आहेस ..काय झाले आहे ?..ती मुलगी पूर्ण भारली होती ..विकट हसली होती …तात्यांनी तिच्या अंगावर काहीतरी ( कदाचित पांढरे, काळे तिळ किंवा अन्य काही टाकले होते . )

ती तिचे दांत खावू लागली , काहीतरी असंबद्ध तात्यांशी बोलत होती . थोड़ा विचित्र प्रकार जाणवला …मुलगी काही वेळाने शांत झाली . तेंव्हा मुलीच्या वडिलांना तात्यांनी सांगीतले की ” समोर बघा ! झाड़ दिसते कां ..? मूलीचे वडिल म्हणाले हो ..!… तात्या म्हणाले तिकडे पहा तिथे त्या झाड़ावर जर तीन वेळ कावळा ओरडला तर सांगा …..आश्चर्य कावळा ओरडला तो सर्वानी ऐकला होता . मीही ऐकला ..होता …त्यानंतर तात्यांनी त्या मुलीच्या वडिलांना काही गोष्टी सांगितल्या व सासवडला ते ज्या ठिकाणी रहात होते तेथील सर्व खुणा सांगितल्या ..आणी विचारले तुमच्या घरात कुणी सवाष्ण व्यक्ती गेली आहे कां ? तर ते खरे होते ..ती अतृप्त आहे .. व ही मुलगी तिन्हीसांजेला ज्या झाड़ापाशी विधीसाठी गेली होती तिथे तीला बाधा झाली आहे . तेंव्हा त्या व्यक्तीला आठवून नमस्कार करा आणी तिथे आवर्जून काही वस्तु , वस्त्र गोष्टी ठेवाव्यास सांगितल्या …ते केल्यानंतर त्या मुलीत फरक पडला असे नंतर कळले… ..

ही मी स्वतः ही तात्यांच्या घरात पाहिलेली घटना आहे ….साधारणतः १९६२/१९६३ सालची…(संक्षिप्त)

 

*©विगसा*

नमस्कार .👍👍

 

*संवाद मिडिया*

 

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची – ओंकार ट्रेडर्स*

 

*लिंक वर क्लिक करा 👇*

————————————————–

*आतुरता गणपती बाप्पाच्या आगमनाची…*🙏🏻😇

 

*सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकमेव☝️ ठिकाण जिथे गणपतीसाठी लागणारे सर्वकाही मिळेल एका छताखाली 😇 तेही अगदी माफक दरात..*

 

🌐 https://sanwadmedia.com/105547

 

🎨 *ओंकार ट्रेडर्स*📿

 

👉 जिल्ह्यातील होलसेलर आणि रिटेलर शॉप

 

👉 गणपतीसाठी लागणारे सर्व प्रकारचे रंग 🎨, ज्वेलरी👑📿, ब्रश🖌️, कॉम्प्रेसर, क्ले टूल्स, इतरही सर्व साहित्य होलसेल दरात मिळतील.😇

 

👉 शाडू माती व प्लास्टर(POP) मिळेल.

 

🎴 *ओंकार ट्रेडर्स*

*माणगाव तिठा, ता. कुडाळ, जि. सिंधुदुर्ग*

 

*प्रो. प्रा. श्रीम. योगिता तामाणेकर*

 

☎️ *संपर्क :* ०२३६२ – २३६२६१

📱 *मो.९४२३३०४७९६,* *७७७४९००५०१,* *९४२१२६१०८९,* *९८३४३४३५४९*

 

————————————————–

_संवाद मीडिया जगभर घडणाऱ्या घडामोडींचा ताजा व निष्पक्ष वृतांत आपल्यासाठी दिवसभर प्रसारीत करते. साइटवर बातमी प्रसारीत झाल्याबरोबर सूचना मिळवण्यासाठी आमच्या वेबसाइटवर “सूचना (notifications)” ला परवानगी द्या. आम्ही कायम आपल्याला अपडेटेड ठेवू!_

——————————————————-

*वेबसाईट :*

www.sanwadmedia.com

——————————————————-

*फेसबुक पेज :* https://www.facebook.com/snvadmedia

——————————————————-

*इन्स्टाग्राम पेज :*

https://www.instagram.com/sanvadmedia

——————————————————-

*ट्विटर :* https://twitter.com/@mediasanwad

——————————————————

*चॅनेल :* https://www.youtube.com/c/sanvadmedia

——————————————————

📰 *व्हॉट्सऍप* 👇🏻

https://chat.whatsapp.com/BiRiAdzopHTFNHNh3QcKvJ

—————————————————–

*📱जाहिरात व बातम्यासाठी संपर्क : *8356929616*

प्रतिक्रिया व्यक्त करा

three × 3 =