You are currently viewing शासकीय मेडिकल कॉलेजच्या भ्रष्‍टाचाराची चौकशी व्हावी – परशुराम उपरकर 

शासकीय मेडिकल कॉलेजच्या भ्रष्‍टाचाराची चौकशी व्हावी – परशुराम उपरकर 

उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या मुख्य व प्रधान सचिवांकडे तक्रार…

कणकवली

जिल्ह्यातील शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये अडीच कोटींच्या फर्निचर खरेदीचा घोटाळा झाला आहे. हा घोटाळा जाधव नामक क्लार्क हा डीन डॉ.मोरेंच्या सांगण्यावरुन करत होता. त्‍यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी होऊन प्रभारी डीन डॉ. मोरे यांच्यावर कारवाई व्हायला हवी. त्‍याबाबत राज्‍याचे उच्च व तंत्र शिक्षणाचे मुख्य व प्रधान सचिव यांच्याकडे तक्रार केली असल्‍याची माहिती मनसेचे नेते परशुराम उपरकर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

श्री.उपरकर म्‍हणाले, अडीच कोटींच्या फर्निचर खरेदीतील भ्रष्टाचाराचा रात्रीत चाललेला खेळ मनसेने उघड केला होता. त्‍यानंतर मेडिकल कॉलेजचे डीन डॉ. मोरे यांनी पत्रकार परिषद घेत सर्व आरोप फेटाळले. तसेच आपण स्वच्छ प्रतिमेचे असल्याचे दर्शविण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्री अडीच वाजेपर्यंत मेडिकल कॉलेज कार्यालयात बसून संबंधित ठेकेदार आणि क्लार्क जाधव या अडीच कोटींच्या खरेदीची फाईल बनवत होते. मनसेने हे उजेडात आणल्यानंतर प्रशासन अधिकारी नवले व कार्यालय अधीक्षक यांनी पोलिसांत तक्रार दिली.

श्री.उपरकर म्‍हणाले, ज्या कॉम्प्युटर चा पासवर्ड डीन मोरेंकडे असतो त्या कॉम्प्युटरवरील माहिती जाधव क्लार्क पासवर्ड शिवाय कशी घेऊ शकतो? डीन मोरेंचाच हात असल्याशिवाय त्या कॉम्पुटरवरील माहिती जाधव क्लार्ककडे येऊ शकत नाही. प्रभारी डीन डॉ. मोरे यांनी चंद्रपुरात असताना गैरप्रकार केले आहेत. तिथून स्वतःच्या मर्जीतील पुसांडे नामक कर्मचाऱ्याला सिंधुदुर्ग शासकीय मेडिकल कॉलेजमध्ये आणले आहे. तसेच विद्यार्थ्यांसाठी घेतलेले २ टीव्ही संच अद्याप बसवलेले नाहीत. डीन मोरे यांनी राष्ट्रपुरूषांचे फोटोही आपल्या कार्यालयात लावले नसल्याचा आरोपही उपरकर यांनी केला.

15

प्रतिक्रिया व्यक्त करा