You are currently viewing पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा चे औचित्य साधून भाजपा , वेंगुर्ले व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मच्छीमार कुटुंबांची मोफत रक्त तपासणी शिबीर

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा चे औचित्य साधून भाजपा , वेंगुर्ले व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने मच्छीमार कुटुंबांची मोफत रक्त तपासणी शिबीर

वेंगुर्ले

पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त सेवा पंधरवडा चे औचित्य साधून भाजपा – वेंगुर्ले व कोकण कला व शिक्षण विकास संस्थेच्या वतीने वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा – मुठ व नवाबाग वाडीतील १५० मच्छीमार कुटुंबांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली .
भाजपा च्या वतीने सेवा पंधरवडा मध्ये विवीध सेवाकार्य हाती घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचा वाढदिवस उस्ताहात साजरा केला .
सकाळच्या सत्रात उभादांडा – मुठ येथील केपादेवी मंदीरात शिबीराचे आयोजन केले होते , यावेळी केपादेवी देवस्थानचे अध्यक्ष व नगराध्यक्ष राजन गीरप , तालुकाध्यक्ष सुहास गवडंळकर , ता.सरचिटणीस बाबली वायंगणकर यांच्या उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन झाले .
तसेच दुपारच्या सत्रात नवाबाग शाळेत शिबीराचे आयोजन करण्यात आले . यावेळी जिल्हा सरचिटणीस तथा सेवा पंधरवडा जिल्हा संयोजक प्रसंन्ना देसाई , मच्छीमार सेलचे दादा केळुसकर , जिल्हा का.का.सदस्य वसंत तांडेल यांच्या प्रमुख उपस्थितीत शिबीराचे उद्घाटन झाले .
यावेळी कोकण कला व शिक्षण विकास संस्थेचे प्रकल्प व्यवस्थापक अजिंक्य शिंदे , अवंती गवस , प्रदीप पवार , हिंद लॅबचे जिल्हा समन्वयक प्रशांत जाधव , शुभम परब , आशिष परब , शिवराम तवटे इत्यादींच्या टीमने तपासणी केली . या शिबिरामध्ये सर्व प्रकारच्या रक्त तपासण्या ( CBC , HB , LFT , KFT , TFT ( थायराॅईड ) PCR , HBV ,HCV ) मोफत केल्या .
यावेळी शाळेची मुख्याध्यापिका तन्वी रेडकर , शिक्षक रामा पोळजी , तसेच ग्रामस्थ शंकर तारी , श्रीकांत तांडेल , नारायण तारी उपस्थित होते .

प्रतिक्रिया व्यक्त करा