You are currently viewing सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघटक पदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघटक पदी चंद्रकांत उर्फ बाळा गावडे

सावंतवाडी :

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघ संघटक म्हणून चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. बाळा गावडे हे गेल्या विधानसभा निवडणुकीत सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून उबाठाचे उमेदवार म्हणून प्रबळ दावेदार होते.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मातोश्रीवरून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नवनियुक्त पदाधिकाऱ्यांची निवड केली. त्यात सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाचे संघटक म्हणून सावंतवाडी विधानसभेचे प्रबळ दावेदार असलेल्या चंद्रकांत उर्फ बाळा गावडे यांची विधानसभा संघटक म्हणून नियुक्ती केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा प्रवक्ते म्हणून डॉ. जयेंद्र परुळेकर, वेंगुर्ले उपजिल्हाप्रमुख संजय गावडे, वैभववाडी उपजिल्हाप्रमुख लक्ष्मण रावराणे, दोडामार्ग उपजिल्हाप्रमुख रामराव उर्फ चंदन गावकर, वैभववाडी उपजिल्हा संघटक वसंत खानविलकर, दोडामार्ग उपजिल्हा संघटन लक्ष्मण आयनोडकर, मालवण उपजिल्हा संघटन विनोद सांडव, कणकवली तालुका प्रमुख राजू राठोड, वैभववाडी तालुका संघटक रमाकांत मोरे, सावंतवाडी तालुका संघटक निशांत तोरस्कर, वेंगुर्ले तालुका संघटक विजय नाईक, कुडाळ उपतालुका संघटक राजेश टगसाळी, ओबीसी सेल कुडाळ तालुका संघटक नारायण उर्फ आप्पा मांजरेकर यांची निवड करण्यात आली आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा