You are currently viewing पंतप्रधान मोदी यांच्या चित्र प्रदर्शनाचे आज कणकवलीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन

पंतप्रधान मोदी यांच्या चित्र प्रदर्शनाचे आज कणकवलीत केंद्रीय उद्योगमंत्री नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन

कणकवली :

 

पंतप्रधान मोदी यांच्या चित्र प्रदर्शनचे आज कणकवलीत केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणेंच्या हस्ते उद्घाटन झाले. हे प्रदर्शन कणकवली पेट्रोल पंपा समोर आयोजित करण्यात आले होते.

या प्रदर्शनातील फोटो पेक्षा कित्येक पटीने नरेंद्र मोदी यांचे कार्य मोठे आहे. हे कार्य आणि त्यांचा जीवनपट पुस्तक रूपाने समाजातील प्रत्येक घराघरात न्या असे आवाहन केंद्रीय उद्योग मंत्री नारायण राणे यांनी यावेळी केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त देशभरात सेवा पंधरावडा आयोजित करण्यात आला असताना या सेवा पंधरावडयाच्या निमित्ताने कणकवलीत भाजपाच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जीवनपट उलगडणाऱ्या चित्र प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते.

या उद्घाटन प्रसंगी आमदार नितेश राणे यांच्यासह जिल्हाध्यक्ष राजन तेली, नगराध्यक्ष समीर नलावडे, उपनगराध्यक्ष बंडू हर्णे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, प्रांताधिकारी वैशाली राजमाने, तहसीलदार आर जे पवार, डॉ. मिलिंद कुलकर्णी, गोट्या सावंत, नगरसेवक अभिजित मुसळे, मेघा गांगण, आण्णा कोदे, विराज भोसले, शिशिर परुळेकर, सरपंच संतोष राणें, बबलू सावंत, गणेश तळगावकर, तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, संतोष कानडे, जिल्हा उपाध्यक्ष राजन चिके, राजश्री धुमाळे, प्राची कर्पे, संजना सडदेकर संदीप मेस्त्री, महेश सावंत, नितीन पाडावे, सरपंच मंगेश तळगावकर, प्रशांत राणें, पंढरी वायंगणकर, वरवडे सरपंच भाई बांदल, सुरेश सावंत, आप्पा सावंत, परशुराम झगडे, प्रज्वल वर्दम, माजी सभापती मनोज रावराणे, सरपंच सचिन पारधीये, नगरसेविका मेघा सावंत, सायली सावंत, शिवप्रसाद देसाई, संतोष चव्हाण, सदा चव्हाण, अभय राणें, नगरसेवक रवींद्र गायकवाड, बंडू गांगण, माजी सभापती भाग्यलक्ष्मी साटम, प्रकाश सावंत, सरपंच सुहास राणे, लक्ष्मण घाडीगावकर, संदीप सावंत, नितीन पाडावे, भाई आंबेलकर, समर्थ राणें, नामदेव जाधव आणि मोठ्या संख्येने भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन निलेश पवार यांनी केले.

प्रतिक्रिया व्यक्त करा

20 + 13 =