You are currently viewing सिताराम कुडतरकर यांचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळल्याबद्दल सत्कार

सिताराम कुडतरकर यांचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळल्याबद्दल सत्कार

कणकवली :

ग्राहक पंचायत महाराष्ट राज्य यांच्यातर्फे कोकण विभागाचा उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्कार मिळाल्याबद्दल येथील सामाजिक कार्यकर्ते तथा ग्राहक पंचायतचे सिंधुदुर्ग जिल्हा उपाध्यक्ष ,ज्येष्ठ नागरिक सेवा संघाचे कणकवली तालुकाध्यक्ष सीताराम उर्फ दादा कुडतरकर यांचा मालवण येथील संस्कार सभागृहात सत्कार करण्यात आला.

ग्राहक चळवळीला समर्पित होऊन ग्राहकांच्या समस्या,तक्रारी,प्रबोधन यासाठी कार्यरत असणाऱ्या ग्राहक पंचायत महाराष्ट्र संघटनेच्या कार्यकर्त्यास उत्कृष्ट कार्यकर्ता पुरस्काराने गौरविणेत येते. हाच पुरस्कार श्री. कुडतरकर यांना नुकताच जाहीर झाला. त्यानिमित्ताने मालवण येथील डॉ. राहुल वालावलकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ग्राहक पंचायत जिल्हास्तरीय प्रबोधन कार्यशाळेत राज्य सचिव अरुण वाघमारे, राज्य संघटक सर्जेराव जाधव,वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे, जिल्हाध्यक्ष प्रा. सुरेश पाटील, ग्राहक आयोगाचे माजी सदस्य कमलाकांत कुबल, ग्राहक पंचायत मालवण शाखा उपाध्यक्ष श्री. बागवे आदींच्या उपस्थितीत कुडतरकर यांचा स्मृती चिन्ह, शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ग्राहक पंचायत महाराष्ट्र सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीचे संघटक विष्णुप्रसाद दळवी, सहसंघटक श्री. मोहिते, सहसंघटिका सौ. रिमा भोसले, सचिव संदेश तुळसणकर,सहसचिव सौ सुगंधा देवरुखकर, मालवण शाखेचे संघटक नितिन वाळके, सहसंघटिका सौ. वफा खान ,सचिव श्री. मालंडकर, महेश काळसेकर, रत्नाकर कोळंबकर, कणकवली शाखेच्या अध्यक्षा सौ श्रद्धा कदम, सचिव सौ पूजा सावंत, विनायक पाताडे, सुभाष राणे,राजन भोसले,वैभववाडी शाखेचे अध्यक्ष तेजस साळुंके,जिल्हा सल्लागार समीर वंजारी आदी उपस्थित होते.

प्रतिक्रिया व्यक्त करा