You are currently viewing सावंतवाडीतील ज्येष्ठ उद्योजक रामचंद्र पांगम यांचे निधन

सावंतवाडीतील ज्येष्ठ उद्योजक रामचंद्र पांगम यांचे निधन

सावंतवाडीतील ज्येष्ठ उद्योजक रामचंद्र पांगम यांचे निधन

वैकुंठ रामा पांगम बेकरीचे मालक; व्यापारी क्षेत्रात शोककळा

सावंतवाडी

सावंतवाडी उभाबाजार येथील ज्येष्ठ व्यावसायिक तथा वैकुंठ रामा पांगम बेकरीचे मालक रामचंद्र वैकुंठ पांगम (वय ८१) यांचे गुरुवारी दुपारी गोवा येथील रुग्णालयात अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या निधनाने सावंतवाडीतील व्यापारी व सामाजिक क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे.

रामचंद्र पांगम हे अनेक वर्षे व्यावसायिक क्षेत्रात कार्यरत होते. आपल्या मनमिळाऊ स्वभाव, प्रामाणिक व्यावसायिक वृत्ती आणि ग्राहकांशी जिव्हाळ्याच्या नात्यामुळे त्यांनी सावंतवाडीत वेगळे स्थान निर्माण केले होते. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी असून त्यांच्यावर गोव्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.

त्यांच्या पश्चात दोन भाऊ, मुले, मुलगी, सुना आणि नातवंडे असा परिवार आहे. सावंतवाडीतील नामांकित नाव्हेल्टी ट्रेडर्सचे मालक प्रकाश पांगम व रमाकांत पांगम यांचे ते बंधू, तर इलेक्ट्रॉनिक अभियंता विनीत पांगम यांचे ते वडील होत. त्यांच्या निधनाबद्दल विविध स्तरांतून श्रद्धांजली वाहण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा