You are currently viewing बॅ.नाथ पै जन्मशताब्दी सोहळ्याची 01 ऑक्टोबर 2022 रोजी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले येथे सांगता

बॅ.नाथ पै जन्मशताब्दी सोहळ्याची 01 ऑक्टोबर 2022 रोजी शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत वेंगुर्ले येथे सांगता

25 सप्टेंबर, 2021 ते 25 सप्टेंबर, 2022 हे बॅ.नाथ पै यांचे जन्मशताब्दी वर्ष म्हणून साजरे केले जात आहे. त्या निमित्ताने बॅ. नाथ पै फाऊंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंट, बॅ.नाथ पै शिक्षण संस्था, यांच्या संयुक्त विद्यमाने ‍ व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेज यांच्या सहकार्याने बॅ. नाथ पै यांच्या जन्मशताब्दी सोहळ्याचा सांगता समारंभ दिनांक 01 ऑक्टोबर, 2022 रोजी त्यांच्या जन्मगावी -वेंगुर्ला येथील मधुसुदन कालेलकर सभागृहात महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा केंद्रीय माजी कृषिमंत्री, माजी स़रक्षण मंत्री मा.शरदचंद्र पवार, यांच्या अध्यक्षतेखाली, महाराष्ट्र राज्याचे शालेय शिक्षण मंत्री ना‌.दीपक केसरकर, महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत, खासदार विनायक राऊत आणि स्वातंत्र्य सैनिक विठ्ठल याळगी यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आयोजित करण्यात आला आहे.

विशेष म्हणजे नाथ पै यांचे बालपणीचे मित्र आणि स्वातंत्र्य सैनिक, बेळगाव सीमा प्रश्नाच्या आंदोलनाच्या वेळी बॅ.नाथ यांच्या खांद्याला खांदा लावून लढ्यात भाग घेतलेले श्री.विठ्ठल याळगी बेळगावाहून खास ह्या कार्यक्रमासाठी येत आहेत.स्वातंत्र्य चळवळीतील त्यांच्या योगदानासाठी त्यांना ह्या कार्यक्रमादरम्यान गौरवण्यात येणार आहे.

कला आणि साहित्याशी नाथ पै यांचे जवळचे नाते होते. ते राजकारणात उतरले नसते तर उत्तम साहित्यिक झाले असते असे अनेक जण त्यांच्याबद्दल गौरवाने बोलत असतात. त्याची आठवण म्हणून ह्या सोहळ्यात एक छोटा सांस्कृतिक कार्यक्रमही आयोजकांतर्फे आयोजित करण्यात आला आहे.

बॅ.नाथ पै फाउंडेशन फॉर कोकण डेव्हलपमेंटच्या संस्थापक अध्यक्षा अदिती पै,बॅ.नाथ पै शिक्षण संस्थेचे चेअरमन उमेश गाळवणकर व सहयोगी आयोजक व्हिक्टर डान्टस लॉ कॉलेजचे संस्थापक अध्यक्ष व्हिक्टर डान्टस यांच्यातर्फे सर्व नाथांच्या चाहत्यांना तसेच कोकणवासीयांना आणि वेंगुर्ल्याच्या रहिवाश्यांना या कार्यक्रमास उपस्थित राहाण्यासाठी आग्रहाच निमंत्रण देण्यात येत आहे.

प्रतिक्रिया व्यक्त करा

14 − two =